'निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी एका कोपऱ्यात चहाची टपरी चालवतील, भजी विकतील!'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 11:05 AM2019-04-13T11:05:01+5:302019-04-13T11:33:53+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बदरुद्दीन अजमल यांनी आक्षेपार्ह भाषा वापरलीय.

Lok Sabha Election: 'After election, PM Narendra Modi will run for tea stall and sell pakoda also' | 'निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी एका कोपऱ्यात चहाची टपरी चालवतील, भजी विकतील!'

'निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी एका कोपऱ्यात चहाची टपरी चालवतील, भजी विकतील!'

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत वादग्रस्त विधानं, जीभ घसरण्याचे प्रकारही काही ठिकाणी होत आहेत. आसाममधील नेते बदरुद्दीन अजमल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार दणक्यात सुरू आहे. प्रतिस्पर्ध्यांवर, विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत, टीका-टोले-टोमणेही दणक्यात सुरू आहेत. त्याचवेळी, वादग्रस्त विधानं, जीभ घसरण्याचे प्रकारही काही ठिकाणी होत आहेत. या यादीत आता आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटचे नेते बदरुद्दीन अजमल यांचं नाव जोडलं गेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरलीय.

नरेंद्र मोदींच्या विरोधात जी महाआघाडी तयार झालीय, त्यात आमचा पक्षही आहे. आम्ही सगळे विरोधक मिळून यावेळी मोदींना देशाबाहेर काढू. त्यानंतर एका कोपऱ्यात मोदींची चहाची टपरी असेल. चहासोबत ते भजीही विकतील, अशी अशोभनीय टिप्पणी बदरुद्दीन अजमल यांनी केली आहे. अजमल हे आसाममधील धुबरी मतदारसंघाचे खासदार असून १२ वर्षांपूर्वी त्यांनीच एआययूडीएफची सुरुवात केली होती. 


अजमल यांच्याआधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका करताना भाजपा खासदार उदय प्रताप सिंह यांचा तोल गेला होता. पूर्वी परदेशात भारतीय व्यक्ती गेली की तिथले लोक म्हणायचे चोरांच्या देशातून आलाय. परंतु, आता मोदींच्या भारतातून आल्याचं बोललं जातं. मोदींनी देशाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. उद्या राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास, भारताचा पंतप्रधान पप्पू आहे, अशी खिल्ली उडवली जाईल, असं आक्षेपार्ह विधान त्यांनी केलं होतं.

इतर काही वादग्रस्त विधानं...




 

Web Title: Lok Sabha Election: 'After election, PM Narendra Modi will run for tea stall and sell pakoda also'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.