शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 14:29 IST

अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीसंदर्भात भाष्य केले होते. एका वर्षानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि अमित शहा यांना पंतप्रधान करतील, असे केजरीवाल म्हणाले होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीसंदर्भात भाष्य केले होते. एका वर्षानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि अमित शहा यांना पंतप्रधान करतील, असे केजरीवाल म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर आता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राजनाथ सिंह म्हणाले, "माझे ऐका, भारतीय जनता पक्षाचा एक ज्येष्ठ नेते या नात्याने मला सांगायचे आहे की, 2024 मध्ये तेच (नरेंद्र मोदी) भारताचे पंतप्रधान म्हणून राहतील आणि 2029 मध्येही तेच भारताचे पंतप्रधान होतील." ते एएनआयसोबत बोलत होते.

PM मोदींनी जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली -राजनाथ सिंह म्हणाले, "मला वाटते याहून अधिक स्पष्टपणे आणखी काहीही सांगता येणार नाही. ज्या व्यक्तीने संपूर्ण जगात भारताचा डंका वाजवला... पंतप्रधान मोदींनी संपूर्ण जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली आहे. 2014 पूर्वी अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जो देश 14व्या स्थानावर होता, तो आज जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी तयार आहे."

काय म्हणाले होते केजरीवाल- मद्य घोटाळा प्रकरणी कारागृहातून पॅरोलवर बाहर आलेले अरविंद केजरीवाल म्हणाले, "मी भाजपला विचारतो की, त्यांचा पंतप्रधान कोण असेल? मोदी तर पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला 75 वर्षांचे होत आहेत. 75 वर्षांच्या लोकांना निवृत्त केले जाईल, असा नियम त्यांनी बनवला होता."

पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले होते, "लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना मत देण्याचा अर्थ अमित शाह यांना मत देणे आहे. कारण नरेंद्र मोदी पुढील वर्षात 75 वर्षांचे होतील आणि ते निवृत्त झाल्यानंतर, अमित शाह देशाचे पंतप्रधान होतील."

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rajnath Singhराजनाथ सिंहNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा