शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आगामी लोकसभेसाठी विरोधकांचा प्रमुख चेहरा कोण असेल? अखिलेश यादव म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 18:12 IST

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत.

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष रणनीती आखत आहेत. सत्ताधारी भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी प्रमुख विरोधी पक्षांनी बैठका सुरू केल्या आहेत. विरोधकांचा प्रमुख चेहरा कोण असेल, यावर अद्याप एकमत झाले नाही. दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना विचारण्यात आले की, तुम्ही 2024 मध्ये स्वत:ला विरोधी पक्षाचा चेहरा मानतात का? या प्रश्नावर अखिलेश यादव म्हणाले की, आमच्याकडे अनेक चेहरे आहेत, वेळ आल्यावर आम्ही निर्णय घेऊ.

पीडीए एनडीएचा पराभव करणारसपा अध्यक्ष अखिलेश यादव मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, भाजप विरोधकांमध्ये फूट पाडण्यासाठी अशा प्रकारे मुद्दे उपस्थित करते की, विरोधकांना चेहराच नाही. आम्ही एकत्र आहोत आणि सर्वांची प्रादेशिक ताकद वाढली आहे. आमच्याकडे चेहरे खूप आहेत, पण भाजपकडे चेहरा नाही. यावेळी पीडीए(विरोधी पक्ष) एनडीएचा पराभव करणार.

येत्या काही दिवसांत भाजप संपणार अखिलेश पुढे म्हणाले की, हे सरकार असे आहे की, टोमॅटोची बातमी दाखवली तर खवळते. आज एवढी महागाई आहे, पीठ, तांदूळ, डाळी, पेट्रोल सगळेच महागले आहे आणि सरकार काही लोकांना फायदा देण्याचे काम करत आहे. मी मुंबईत एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आलो होतो. पण, मी काही नेत्यांना भेटणार असल्याच्या बातम्या येत आहेत. महाराष्ट्रात बरेच फेरबदल झाल्याचे ऐकले. आता बातम्या येत आहेत की, समाजवादी पार्टी यूपीमधून फुटणार आहे. मी म्हणतो की येत्या काही दिवसांत भाजप संपेल. भाजप समाजात फूट पाडण्याचे काम करते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी