शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचे दावेदार कोण? खरगे यांनी दिले उत्तर; जागाही सांगितल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 16:39 IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विजय मिळवेल असा दावा मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) :  लोकसभा निवडणुकीतील प्रचार सभांच्या तोफा काल सायंकाळी ५ वाजता थंडावल्या आहेत, उद्या १ जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होणार असून ४ जून रोजी लोकसभेचे निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, आता लोकसभा निकालाबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 'एबीपी न्यूज' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी पंतप्रधानपदाबाबतही भाष्य केलं आहे.   

कोकण पदवीधर निवडणुकीत मनसे बाजी मारणार?; "राज ठाकरेंचा डाव खरा ठरणार..."

यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. "यावेळी आम्ही सरकार स्थापन करणार आहोत. इंडिया आघाडीला २७५ पेक्षा जास्त जागा मिळतील, यावेळी आम्हाला सर्व बाजूंनी चांगले अहवाल आले आहेत. इंडिया आघाडीच्या वतीने भाजप पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. त्यावर उत्तर देताना खरगे म्हणाले, 'निवडणुकीनंतर घटक पक्षांची बैठक होऊन या विषयावर निर्णय घेतला जाईल.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपताच पंतप्रधान मोदी गुरुवारी ३० मे संध्याकाळी कन्याकुमारीला गेले आहेत. कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलच्या ध्यान मंडपममध्ये त्यांचे ४५ तासांचे ध्यान चालू आहे. यावरही निशाणा साधत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ही तपश्चर्या म्हणजे शो आहे. जर त्यांना तपश्चर्या करायची असेल तर ते घरी बसूनही करू शकतात. दहा हजार पोलिसांसोबत तुम्ही कोणतीही तपश्चर्या करू शकत नाही. ते फक्त ढोंग करत आहेत. जर त्यांना एखाद्या गोष्टीसाठी पश्चात्ताप करायचा असेल तर ते घरी तपश्चर्या करून ते करू शकतात, असा टोलाही खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

लोकांनी निवडले जगण्याशी संबंधित मुद्दे

खरगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, भाजपने फूट पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकांनी जगण्याशी संबंधित मुद्दे निवडले. आम्हाला विश्वास आहे की, जनता ४ जून रोजी पर्यायी सरकारसाठी जनादेश देईल आणि ‘इंडिया’ आघाडी नवीन सरकार स्थापन करेल. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

पंतप्रधान मोदींवर टीका करताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, जर तुम्हाला महात्मा गांधी आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती नसेल तर कदाचित तुम्हाला संविधानाचीही माहिती नसेल. मी पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. पक्षाला मला न मागता सर्वकाही दिले नाही, पक्षाचे अध्यक्षपद दिले आहे, असे खरगे म्हणाले.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस