शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 17:28 IST

'पाकिस्तानात राहुल गांधी अत्यंत लोकप्रिय आहेत. जर पाकिस्तानात एखादी निवडणूक झाली, तर राहुल गांधी तेथून मोठ्या फरकाने नक्की निवडून येतील,' असे हिमंता यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यंचे कौतुक केले. यानंतर, आता तो भारताच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा बनला आहे. यावरूनच आता आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी यावरून टोमणा मारला आहे. 'पाकिस्तानातराहुल गांधी अत्यंत लोकप्रिय आहेत. जर पाकिस्तानात एखादी निवडणूक झाली, तर राहुल गांधी तेथून मोठ्या फरकाने नक्की निवडून येतील,' असे हिमंता यांनी म्हटले आहे.

आम्ही पाकिस्तानात राहुल यांच्या विरोधात जिंकू शकणार नाही -फवाद चौधरी यांनी केलेल्या राहुल गांधीं यांच्या स्तुतीसंदर्भात विचारले असता हिमंता म्हणाले, 'राहुल गांधी तेथून (पाकिस्तान) उभे राहिले तर, नक्कीच मोठ्या मतांधिक्याने विजयी होतील. आम्ही पाकिस्तानात राहुल यांच्या विरोधात जिंकू शकणार नाही. राहुल गांधी पाकिस्तानातील निवडणुकीत नक्कीच जिंकतील. मात्र, सत्य असे आहे की, पाकिस्तानला जे हवे आहे, भारतात त्याच्या उलटे होणार.

'भारत केवळ नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहणार' -राहुल गांधींवर निशाणा साधताना हिमंता म्हणाले, पाकिस्तानात राहुल गांधी अत्यंत प्रसिद्ध आहेत. ते तेथून सह निवडणूक जिंकू शकतात. मात्र, ते भारतात जिंकू शकत नाही. भारतत तर केवळ नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहणार.'

काय म्हणाले होते फवाद? -पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी नुकताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर राहुल गांधींचे कौतुक करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ते पंतप्रधान मोदी सरकारवर बड्या उद्योगपतींशी मिलीभगत असल्याचा आरोप करताना दिसत होते. हा व्हिडिओ शेअर करताना फवाद यांनी 'राहुल गांधी ऑन फायर', असे लिहिले होते. हा व्हिडिओ समोर आल्यापासून, भाजपाने राहुल गांधींवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तान