शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तृणमूलचा ‘इंडिया’ला दे धक्का! प. बंगालमधील सर्वच्या सर्व ४२ जागांसाठी उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 05:43 IST

काँग्रेससह मित्रपक्षांसाठी एकही जागा सोडली नाही.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने इंडिया आघाडीला धक्का देत राज्यातील सर्व ४२ लोकसभा मतदार संघासाठी रविवारी उमेदवारांची यादी जाहीर केली. काही विद्यमान खासदारांची तिकिटे कापताना पक्षाने यावेळी माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण व कीर्ती आझाद यासारख्या अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली. विशेष म्हणजे पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांनी मित्रपक्ष काँग्रेससाठी एकही जागा सोडली नाही.

तृणमूलने १६ विद्यमान खासदारांवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. या यादीत १२ महिलांच्या नावांचा समावेश आहे. क्रिकेटपटू युसूफ पठाण बहरामपूर, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना आसनसोलमधून, कीर्ती आझाद यांना वर्धमान-दुर्गापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. बसीरहाट लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार नुसरत जहाँ यांच्या जागी माजी खासदार हाजी नुरुल इस्लाम यांना संधी देण्यात आली आहे. 

याशिवाय लोकसभेतून हकालपट्टी झालेल्या महुआ मोईत्रा यांना सलग दुसऱ्यांदा कृष्णानगर मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. अभिनेत्री सायोनी घोष, देबांगशु भट्टाचार्य, गोपाल लामा, अभिनेत्री रचना बॅनर्जी हे काही नवे चेहरे आहेत. कोलकाता येथे आयोजित तृणमूलच्या मेळाव्यात ही यादी जाहीर करण्यात आली. 

काँग्रेसला अद्यापही युतीची आशा 

- पश्चिम बंगालमधील सर्व जागांसाठी तृणमूल काँग्रेसने एकतर्फी उमेदवारांची घोषणा केली असताना काँग्रेसला अद्यापही युतीची आशा आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आपले दरवाजे युतीसाठी खुले असल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.- काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, काँग्रेसने बंगालमध्ये तृणमूलसोबत जागावाटपावर सन्मानजनक करार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  काँग्रेसला दोनपेक्षा जास्त जागा देऊ शकत नाहीत, असे तृणमूलने म्हटले आहे.

युसूफ पठाण विरुद्ध अधीर रंजन चौधरी?

क्रिकेटपटू युसूफ पठाण लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून मैदानात आहे. 

आम्ही बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढणार. काँग्रेस, भाजप, माकपा यांचा मुकाबला करणार. आम्ही आसाम आणि मेघालयातही लढणार. उत्तर प्रदेशात एका  जागेसाठी समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्याशी चर्चा सुरू आहे. - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगाल