शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

'रामनवमी येत आहे, या पापी लोकांना विसरू नका', PM मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 15:15 IST

'2014 पूर्वी देशात काय परिस्थिती होती, हे मी कधीही विसरू शकत नाही. करोडो देशवासीयांना मातीच्या घरात राहावे लागायचे, उघड्यावर शौचास जावे लागायचे, मोफत रेशन मिळत नव्हते, दवाखान्यात उपचारासाठी भटकावे लागायचे.'

Narendra Modi Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यात मॅरेथॉन सभा घेत आहेत. आज त्यांनी बिहारच्या नवादा येथे जाहीर सभेला संबोधित करताना विरोधकांच्या INDIA आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. इंडिया आघाडीच्या नेत्यांचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले, 'ते म्हणतात की मोदींनी गॅरंटी देणे योग्य नाही, त्यावर बंदी घातली पाहिजे. मोदींनी दिलेली गॅरंटी बेकायदेशीर असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मी गॅरंटी देतो, कारण माझी नियत साफ आहे. मी गॅरंटी देतो, कारण माझ्यात ती पूर्ण करण्याची ताकद आहे, असं मोदी म्हणाले.

विरोधकांच्या मनात श्रीरामाविषयी वैरजानेवारी महिन्यात अयोध्येत बांधलेल्या श्रीराम मंदिराचा भव्य सोहळा झाला, त्या सोहळ्याकडे बहुतांश विरोधी पक्षांनी पाठ फिरवली होती. अशा नेत्यांवर निशाणा साधत पीएम मोदी म्हणाले की, अयोध्येत रामललाचे भव्य मंदिर उभारले जाईल, अशी गॅरंटी मी दिली होती, आज मंदिर बांधून तयार आहे. राम मंदिराचे काम थांबवण्यासाठी काँग्रेस आणि राजदने वर्षानुवर्षे प्रयत्न केले, पण अखेर ते पूर्ण झाले.  विरोधकांच्या मनात भगवान राम, अयोध्येशी काय वैर आहे की, त्यांनी राम मंदिराच्या सोहळ्याला एवढा विरोध केला. त्यांच्या मनात इतके विष भरले आहे की, त्यांच्या पक्षातील काही लोक सोहळ्यात सामील झाले म्हणून त्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. 

रामनवमी येत आहे, पाप करणाऱ्यांना विसरू नका...रामनवमी येत आहे, ही पापे करणाऱ्यांना विसरू नका. त्यांनाही माहितेय की, मोदींच्या गॅरंटीमुळे त्यांची दुकान बंद होत आहे, म्हणूनच हे लोक मोदींच्या गॅरंटीला विरोध करत आहेत. इंडिया आघाडीकडे ना दूरदृष्टी आहे, ना विश्वासार्हता आहे. ते दिल्लीत एकत्र येतात आणि आपापल्या राज्यात एकमेकांना शिव्या देतात. ते बळजबरीने एकत्र आले आहेत. INDIA आघाडी म्हणजे देशद्रोही शक्तींचे घर आहे. या आघाडीचे लोक भारताचे विभाजन करण्याची भाषा बोलतात. काँग्रेस आणि आरजेडीला एकही मत मिळण्याचा अधिकार नाही. या लोकांना सत्तेचे व्यसन लागले आहे. सत्तेतून बाहेर पडताच ते पाण्यातल्या माशाप्रमाणे तडफड करतात, अशी घणाघाती टीका मोदींनी यावेळी केली.

मोदींचा जन्म मौजमजा करण्यासाठी झाला नाहीगेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. मोदीचा जन्म मौजमजा करण्यासाठी झाला नाही, तर कष्ट करण्यासाठी झाला आहे. मी देशातून गरिबी हटवण्याच्या मिशनमध्ये गुंतलो आहे. तुमच्याप्रमाणे मीही गरिबीत पुढे आलोय. 2014 पूर्वी देशात काय परिस्थिती होती हे मी कधीही विसरू शकत नाही. करोडो देशवासीयांना मातीच्या घरात राहावे लागायचे, उघड्यावर शौचास जावे लागायचे, गरिबांना मोफत रेशन मिळत नव्हते, दवाखान्यात उपचारासाठी भटकावे लागायचे. गेल्या दहा वर्षांत सरकारने गरिबांच्या कल्याणासाठी जे काम केले, ते स्वातंत्र्याच्या सहा दशकातही झाले नाही. जोपर्यंत गरिबी हटवत नाही, तोपर्यंत मला शांत झोप येणार नाही. ता देशातील माझ्या कुटुंबीयांनी तिसऱ्यांदा मजबूत सरकार स्थापन करण्याचा संकल्प केला आहे, असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४bihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४