शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

"...104वी शिवी, फरक पडत नाही"; संजय राऊतांच्या 'औरंगजेब' वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 10:09 IST

मोदी म्हणाले, विरोधकांनी औरंगजेब म्हणून 104व्या वेळा अपशब्द वापरला आहे. याने काही होणार नाही, कारण आम्ही लोकसभा निवडणुकीत विजय मिळवू.

शिवसेना (उद्धव ठाके गट) नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या 'औरंगजेब' वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (20 मार्च) थेट विरोधी आघाडीवरच निशाणा साधला आहे. मोदी म्हणाले, विरोधकांनी औरंगजेब म्हणून 104व्या वेळा अपशब्द वापरला आहे. याने काही होणार नाही, कारण आम्ही लोकसभा निवडणुकीत विजय मिळवू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूज18 रायजिंग भारत समिटमध्ये बोलताना म्हणाले, "आम्ही पुढील 25 वर्षांचा रोडमॅप तयार करत आहोत आणि आपल्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्या 100 दिवसांचा प्लॅनही तयार करत आहोत. दुसऱ्या बाजूला आमचे विरोधकही नवे विक्रम निर्माण करत आहेत. त्यांनी आजच मोदींना 104वी शिवी दिली आहे. औरंगजेब म्हणत गौरवण्यात आले आहे. माझी खोपडी उडवण्याचे आवाहन करण्यात आले आहे." 

मोदी म्हणाले, आपण आज विकिसित भारत आणि आत्मनिर्भर भारतासंदर्भात बोलत आहोत. केवळ 10 वर्षांत 25 कोटी लोक गरीबीतून बाहेर पडले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर पोहोचली आहे. हे तर काहीच नाही, अजून आणखी पुढे जायचे आहे.''

विरोधकांवर मोदींचा निशाणा -  पंतप्रधान मोदी म्हणाले, आज गरीब मला आशीर्वाद देत असताना, वोरोधकांच्या मनात शिव्या येत आहेत. हे लोक आज त्या गरिबांनाही शिव्या देत आहेत आणि मलाही. मात्र, त्या शिव्यांनी मला काही फरक पडणार नाही. कारण लोक आमच्यासोबत आहेत. 

काय म्हणाले होते संजय राऊत? -संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्र यासाठी मोठा आहे, कारण या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, यामुळे या महाराष्ट्राला इतिहास आहे. आणि आज जे महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत. ते गुजरातचे राज्यकर्ते मोदी असतील किंवा शाह असतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे. शिवसेनेच्या विरोधात आणि आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात." यावेळी, समोरील कार्यकर्त्यांमधून एकेरी नावाने 'मोदी आला मोदी, अशी हाक आली. यावर, मोदी आला नाही, 'औरंगजेब आला म्हणा', असे राऊतांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेना