शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

'कान उघडून ऐका, मोदी जिवंत असेपर्यंत...', OBC आरक्षणावरुन PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 15:49 IST

Lok sabha Election 2024: 'काँग्रेस असा पक्ष आहे, जो पदोपदी बाबासाहेबांचा अपमान करतो, राज्यघटनेचा अपमान करतो आणि सामाजिक न्यायालाही नष्ट करण्याचा प्रयत्न करतो.'

UP Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी(दि.26) उत्तर प्रदेशातील आठ जागांवर मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. संविधान धोक्यात असल्याच्या INDIA आघाडीच्या आरोपांना पंतप्रधानांनी चोख प्रत्युत्तर दिले. संविधान निर्माण करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस पदोपदी अपमान करत असल्याची टीका पंतप्रधानांनी केली.

आग्रा येथे जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस असा पक्ष आहे, जो पदोपदी बाबासाहेबांचा अपमान करतो, राज्यघटनेचा अपमान करतो आणि सामाजिक न्यायालाही नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्याच काँग्रेसने कधी कर्नाटकात, कधी आंध्र प्रदेशात आपल्या जाहीरनाम्यात धर्माच्या आधारावर आरक्षणाचा पुरस्कार केला. सपा-काँग्रेसची आघाडी तर तुष्टीकरणात गुंतलेली आहे. 2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर 100% मुस्लिम लीगची छाप दिसते. काँग्रेसचा संपूर्ण जाहीरनामा फक्त व्होट बँक मजबूत करण्यासाठी आहे. तर, भाजपचा जाहीरनामा देशाला बळकट करण्यासाठी आहे. काँग्रेस-सपाची मैत्री तुष्टीकरणाच्या राजकारणावर आधारित आहे. 

हे तुष्टीकरणाचे राजकारण पंतप्रधान पुढे म्हणाले, हे दोघे मिळून आपल्या भाषणात ओबीसींबद्दल बोलतात आणि आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी मागच्या दाराने ओबीसींचे हक्क हिसकावून घेऊ इच्छितात. आता काँग्रेसने धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 27% OBC कोट्यापैकी काही भाग चोरून, हिसकावून आरक्षण द्यावे, असा मार्ग काँग्रेसने शोधला आहे. पण, आमचा मार्ग तुष्टीकरणाचा नसून, समाधानाचा आहे. सबका साथ, सबका विकास हा आमचा मंत्र आहे. आमचे विचार असे आहेत की, कोणतीही सरकारी योजना असो, त्याचा लाभ सर्व जादी-धर्मातील लोकांना मिळायला हवा. कोणताही भेदभाव न करता, कोणत्याही प्रकारची वैयक्तिक बाब न ठेवता, लाच न घेता प्रत्येकाचे हक्क मिळायला हवा, हाच खरा सामाजिक न्याय असतो.

काही लोकांना भारताची वाढती शक्ती आवडत नाहीकाही लोकांना भारताची वाढती शक्ती आवडत नाही. आता देशात संरक्षण कॉरिडॉर तयार होत आहे, सैन्य स्वावलंबी होत आहे. भारत जगाला शस्त्रे निर्यात करत आहे. जगभर असे अनेक  शस्त्र दलाल आहेत, ज्यांना जुन्या सरकारप्रमाणे मलाई खायला मिळत नाही. असे सर्व लोक आता अस्वस्थ आणि खूप संतापले आहेत. भारतीय लष्कराने स्वावलंबी व्हावे असे त्यांना वाटत नाही, त्यामुळेच ते मोदींविरोधात एकवटले आहेत. या शक्तींना रोखण्यासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा एकदा भाजप आणि एनडीएचे सरकार आणणे अत्यंत आवश्यक आहे, अशी टीकाही पीएम मोदींनी यावेळी केली.

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाCongoकाँगोNarendra Modiनरेंद्र मोदी