शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

कितीही पक्ष एकत्र आणले तरी माेदीच येतील, अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 12:33 IST

Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कारण, त्यांच्या आजी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात लाखो लोकांना तुरुंगात टाकले होते व राजकीय पक्षांवर बंदी घातली होती, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोमवारी येथे केला.

जोधपूर - काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कारण, त्यांच्या आजी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात लाखो लोकांना तुरुंगात टाकले होते व राजकीय पक्षांवर बंदी घातली होती, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी येथे केला. रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या जाहीर  सभेवरून ‘इंडिया’ आघाडीला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, “तुम्ही कितीही पक्ष एकत्र आणले तरी मोदीच येतील.”

जोधपूर येथील शक्ती केंद्र प्रमुख संमेलनाला संबोधित करताना शाह बोलत होते. जो कोणी भ्रष्टाचारात गुंतेल तो तुरुंगात जाईल. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून देण्यासाठी देशातील जनता सज्ज झाली असून, त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, असेही ते म्हणाले. 

इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, काल जमलेली ही मंडळी म्हणाली, लोकशाही वाचवा. का बाबा, लोकशाहीला काय झालंय? या देशातील जनता मतदान करणार आहे.  आमचे नेते तुरुंगात गेले, असा गलका ते करताहेत. बंधू, १२ लाख कोटींचा घोटाळा कराल तर तुरुंगात जाणार नाही तर काय.” पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप राहुल गांधींनी कालच्या सभेत केला होता. शाह पुढे म्हणाले, “ऐका.. तुम्ही का तक्रार करताय? आम्ही २०१४ आणि २०१९ मध्येही ‘जो कोणी भ्रष्टाचार करेल तो तुरुंगात जाईल’ असे म्हणत निवडणूक लढवली होती.”

जेडीएस नेते शाह यांना देणार माहिती कर्नाटकच्या विविध मतदारसंघांतील परिस्थितीचा अभिप्राय आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देणार आहोत, असे जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी मंगळवारी राज्य भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीत सांगितले.   उभय पक्षांतील अविश्वासाचे वातावरण कमी करण्यासाठी या बैठकीचे  आयोजन करण्यात आले होते, असे मानले जाते. उभय पक्षांतील जागावाटप करारानुसार भाजप राज्यात २५ जागांवर, तर जेडीएस तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४