शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 14:48 IST

'आता एका झटक्यात गरिबी हटवण्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसने 60 वर्षात काय केलं?'

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान झाले असून, आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानाकडे देशाचे लक्ष लागले आहे. 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी 12 राज्यांतील 95 जागांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. आज(दि.29) त्यांनी कर्नाटकातील कर्नाटकातील बागलकोट येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. 

60 वर्षात काँग्रेसने काय केले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, इतिहास सांगतो की, काँग्रेसने देशाचं वाटोळं केलंय. जेव्हा-जेव्हा काँग्रेस सत्तेत आली, तेव्हा देशाचा विनाश झालाय. हे लोक पुन्हा आले तर तुमची मुले उपाशी मरतील. कर्नाटकात काँग्रेस सरकार चालवत नाही, तर खंडणीखोर टोळी चालवत आहे. त्यांचा उद्देश फक्त तिजोरी भरणे, एवढाच आहे. गेल्या 10 वर्षात, काँग्रेसने गरिबीचे जीवन जगण्यास भाग पाडलेल्या प्रत्येक वर्गाच्या पाठिशी आम्ही उभे राहिलो. आज हे लोक एका झटक्यात गरिबी हटवण्याचा दावा करतात, पण त्यांचा 60 वर्षांचा काळ पुरावा आहे की, यांनी देशातील गरिबांसाठी काहीही केलं नाही. 

भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल

2024 च्या निवडणुका भारताचे भविष्य ठरवतील. विकसित भारत, स्वावलंबी भारत निर्माण करणे आणि देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे, हे या निवडणुकांचे उद्दिष्ट आहे. काँग्रेसवाले म्हणतात की, भाजपने दलित-वंचितांसाठी काही केले नाही. पण, आज सर्वाधिक ST खासदार भाजपचे आहेत. आता तुमचे मतंच आम्हाला बळ देईल आणि हा देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब आणि स्किल हब बनवण्याचा आमचा संकल्प आहे. तुमच्या मतांमुळे हे शक्य होईल, असे आवाहनदेखील मोदींनी यावेळी केली. 

काँग्रेसचे अल्पसंख्याकांना खूश करण्याचे प्रयत्नपीएम मोदी म्हणाले की, काँग्रेस अल्पसंख्याकांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण एससी/एसटी आणि ओबीसी समुदाय आता भाजपसोबत आहेत. कर्नाटकात काँग्रेसने घटना बदलून एससी-एसटी आणि ओबीसींचे अधिकार काढून घेण्याची मोहीम सुरू केली आहे. आपल्या राज्यघटनेला धर्मावर आधारित आरक्षण मान्य नाही, पण कर्नाटक सरकारने मुस्लिमांना ओबीसी आरक्षणाचा एक भाग दिला. काँग्रेसने यापूर्वीही आपल्या जाहीरनाम्यात धर्मावर आधारित आरक्षणाचा मुद्दा माडंला होता, आता परत काँग्रेसला तेच आणायचे आहे.

काँग्रेसचे मनसुबे मी पूर्ण होऊ देणार नाहीसंसदेतील बहुतांश एससी, एसटी आणि ओबीसी खासदार भाजपचे आहेत आणि त्यामुळे एससी, एसटी आणि ओबीसी भाजपसोबत असल्याचे काँग्रेसला वाटते. आता अल्पसंख्याकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना एससी, एसटी आणि ओबीसींना लुटायचे आहे, पण मी हे होऊ देणार नाही. मी माझ्या दलित, आदिवासी आणि ओबीसी बंधू-भगिनींना हमी देतो की, मी काँग्रेसचे असे हेतू यशस्वी होऊ देणार नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.

टॅग्स :karnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस