शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

केंद्रात पुन्हा मोदी सरकार; नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंनी भाजपला समर्थन पत्रे सोपवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 19:53 IST

Lok Sabha Election Result 2024: नितीश कुमार आणि चंद्राबाबू इंडिया आघाडीत जाण्याची चर्चा सुरू होती, पण आता अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. भाजपला समर्थन पत्रे देण्याचा अर्थ, त्यांनी एनडीए सरकारला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत गाठता आले नाही, पण मित्रपक्षांच्या मदतीने त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आता दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींनाही वेग आला आहे. नुकतीच दिल्लीत एनडीएची बैठक संपली, यात नरेंद्र मोदी यांना संसदीय दलाचा नेता म्हणून निवडण्यात आले. या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी भाजपला समर्थनाची पत्रे दिली आहेत. म्हणजेच, नितीश आणि चंद्राबाबू यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे.

एनडीएच्या हे नेते उपस्थित आज, (दि.5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. तसेच, लोकसभा भंग करण्याची विनंती केली. यानंतर सायंकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी NDA ची तासाभरात बैठक झाली. या बैठकीत नितीश आणि चंद्राबाबू यांच्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पवन कल्याण, जयंत चौधरी, जीतन राम माझी, चिराग पासवान, अनुप्रिया पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्लपटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा जादुई आकडा पार करता आला नाही. त्यामुळेच आता त्यांना मित्रपक्षांची गरज लागणार आहे. विशेष म्हणजे, जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे एन चंद्राबाबू नायडू एनडीए सरकार स्थापन करण्यात किंगमेकरची भूमिका बजावत आहेत. या निवडणुकीत भाजपने 240 जागा जिंकल्या, ज्या बहुमताच्या आकड्यापेक्षा 32 ने कमी आहे. तर, टीडीपी आणि जेडीयूकडे एकूण 28 जागा आहेत. भाजपच्या इतर मित्रपक्षांसोबत मिळून एनडीए बहुमताचा आकडा पार करेल.

एकनाथ शिंदे यांनीदेखील पाठिंबा जाहीर केलाया बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनीदेखील नरेंद्र मोदी यांना समर्थन असल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर पोस्ट करताना शिंदेंनी लिहिले की, 'लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आज दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदीजी यांचे या विजयाबद्दल अभिनंदन करून त्यांना पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड, चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम प्रमाणेच शिवसेनेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी तयार असल्याचे सांगत जाहीर पाठींबा दिला,' असे ते म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी