शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार? पोपटाची भविष्यवाणी; मालकाच्या अडचणी वाढल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 19:10 IST

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, दिग्गज नेत्यांपासून कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी उमेदवार नाना युक्त्या वापरत असतात. पण, सध्या एका पोपटाने केलेल्या भविष्यवाणीने उमेदवाराचा आनंद द्विगुणित झाला पण पोपटाचा मालक मात्र अडचणीत आला. 

दरम्यान, तामिळनाडूमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील कुड्डालोर मतदारसंघातील एक अजब घटना सर्वांचे लक्ष वेधत आहे. येथे भविष्य सांगणाऱ्या पोपटामुळे त्याच्या मालकाच्या अडचणी वाढल्या. खरं तर लोकांचे भविष्य सांगणाऱ्या या पोपटाने पट्टाली मक्कल काची पार्टीचे (पीएमके) उमेदवार विजयी होणार असल्याचा कौल दिला. पोपटाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित पोपटाच्या मालकाला ताब्यात घेतले. मग त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. 

पोपटाची भविष्यवाणी वृत्तसंस्था 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपट दिग्दर्शक थंकर बच्चन हे कुड्डालोर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते पीएमकेच्या तिकिटावर नशीब आजमावत आहेत. यावेळी ते निवडणूक प्रचारासाठी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना ते परिसरात फिरत होते. समर्थकांशी संवाद साधताना त्यांना एका मंदिराजवळ एक पोपट दिसला. हा पोपट लोकांसमोर ठेवलेले कार्ड निवडून भविष्य सांगत असल्याचे बच्चन यांच्या निदर्शनास आले. 

पोपटाला पाहताच थंकर यांनी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी त्याच्या दिशेने कूच केली. तेव्हा पोपट पिंजऱ्यातून बाहेर आला आणि त्याने समोर ठेवलेले एक कार्ड उचलून बाजूला ठेवले. त्यावर तेथील देवतेचा फोटो होता. कार्ड पाहून पोपटाच्या मालकाने निवडणुकीत थंकर बच्चन यांनाच यश मिळेल असा दावा केला. पोपटाने वर्तवलेल्या भविष्यवाणीवर थंकर यांनी आनंद व्यक्त करत त्याला खायला दिले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पोपटाचा मालक सेल्वराज आणि त्याच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४TamilnaduतामिळनाडूPoliceपोलिस