शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Survey: आज निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? NDA की INDIA? समोर आला धक्कादायक कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 20:29 IST

Lok sabha Election 2024: आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर कोण बाजी मारणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. देशात आज निवडणूक झाली तर कोण बाजी मारेल, याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला आता अगदी काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे. एकीकडे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा सलग तिसऱ्यांदा बाजी मारून केंद्रातील सत्ता मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेससह देशातील बहुतांश भाजपाविरोधा पक्षांनी एकत्र येत विरोधकांच्या इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर कोण बाजी मारणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. 

दरम्यान, आज प्रसिद्ध झालेल्या इंडिया टुडे-सी वोटरच्या सर्वेमधून देशात आज निवडणूक झाली तर कोण बाजी मारेल, याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार आज निवडणूक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यांच्यात अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. या सर्वेमधील आकडेवारीनुसार आज निवडणूक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला ४३ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडी जोरदार मुसंडी मारणार असल्याचा अंदाज असून इंडिया आघाडीला ४१ टक्के मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांच्या खात्यात १६ टक्के मतं जाण्याची शक्यता आहे. पक्षनिहाय मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपाला ३८ टक्के, काँग्रेसला २० टक्के आणि इतर पक्षांना ४२ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. 

मतांच्या टक्केवारीचं जागांमध्ये रूपांतर केल्यास भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीला ३०६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला १९३ जागांपर्यंत मजल मारता येण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांच्या खात्यात ४४ जागा जातील.  पक्षनिहाय जागांचा विचार केल्यास यावेळी भाजपाला तीनशेच्या आतच जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपाला २८७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ७४ आणि इतर पक्षांच्या खात्यात तब्बल १८२ जागा जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, भ्रष्टाचाराच्या मुद्यावर मत मांडताना सर्वेमध्ये सहभागी झालेल्या ५४ टक्के लोकांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचार कमी झाल्याचे म्हटले आहे. तर ४१ टक्के लोकांनी भ्रष्टाचार कमी झाला नसल्याचं म्हटलं आहे. याच सर्वेमध्ये भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय का? असा प्रश्न विचारण्यात आला असता तब्बल ४५ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे. तर ३८ टक्के लोकांनी तसा दुरुपयोग होत नसल्याचं म्हटलं आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी