शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ऐन प्रचारादरम्यान राहुल गांधींची प्रकृती बिघडली, काही प्रचारसभा रद्द, समोर येतेय अशी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 16:02 IST

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असतानाच काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची प्रकृती बिघडली असून, प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना मध्य प्रदेशचा सटणा दौरा रद्द करावा लागला आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला  असतानाच काँग्रेसचा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची प्रकृती बिघडली असून, प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना मध्य प्रदेशचा सटणा दौरा रद्द करावा लागला आहे. आता राहुल गांधी यांच्या ऐवजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे सटणाच्या दौऱ्यावर जातील. याबाबत माहिती देताना काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी सांगितले की, राहुल गांधी हे प्रकृती अस्वस्थ्यामुळे आज सटणा येथे येऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सटणा येथे दौरा करण्याची विनंती केली आहे. आता सटणा येथील काँग्रेस उमेदवार सिद्धार्थ कुशवाहा यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या सभेला मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार आहेत. तसेच राहुल गांधी यांच्या लवकरच  राज्यात प्रचारसभा होणार आहेत. तसेच ते जनतेशी संवाद साधणार आहेत.

काँग्रेसच्या मीडिया सेलचे प्रभारी जयराम रमेश यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, राहुल गांधी आज सटना आणि रांचीमध्ये प्रचारासाठी जाणार होते. तिथे इंडिया आघाडीची सभा होणार आहे. मात्र राहुल गांधी हे अचानक आजारी पडले आहेत. तसेच सध्या ते दिल्लीमधून बाहेर जाऊ शकत नाहीत. मात्र राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे सटना येथे सभेला संबोधित करणार आहेत.

मध्य प्रदेशमध्ये पहिल्या टप्पातील मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी सटना येथे मतदान होणार आहे. तिथेच प्रचारसभेसाठी राहुल गांधी हे येणार आहेत. मात्र प्रकृती अस्वस्थ्यामुळे राहुल गांधी यांचा दौरा रद्द करावा लागला आहे. याआधी राहुल गांधी यांनी ८ एप्रिल रोजी मंडला आणि शहडोल येथे प्रचारसभा घेतल्या होत्या.   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसmadhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४