शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आप-कांग्रेसच्या आघाडीमुळे दिल्लीतील समिकरणं बदलली, भाजपाची वाट अवघड? असं आहे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 14:22 IST

Lok Sabha Election 2024: २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दिल्लीमधील सात पैकी ७ जागांवर विजय मिळवला होता. आता आघाडी झाल्याने यावेळी या सातही जागांवर कब्जा करण्याचा दावा आप आणि काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र या दाव्यामध्ये खरोखरच किती दम आहे, २०१४ आणि १९ च्या तुलनेमध्ये ही आघाडी कुठे उभी आहे, हे पाहिल्यास यावेळी दिल्लीमध्ये रोमांचक लढत होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची गाडी रुळावर येताना दिसत आहे. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा सुटल्याने इंडिया आघाडीचं बळ वाढलं आहे. दोन्ही पक्षांमधील वाटाघाटींनुसार दिल्लीमध्ये आप ४ आणि काँग्रेस ३ जागांवर लढण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. आता दिल्लीत हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने येथील  लोकसभेच्या ७ जागांचं गणित बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दिल्लीमधील सात पैकी ७ जागांवर विजय मिळवला होता. आता आघाडी झाल्याने यावेळी या सातही जागांवर कब्जा करण्याचा दावा आप आणि काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र या दाव्यामध्ये खरोखरच किती दम आहे, २०१४ आणि १९ च्या तुलनेमध्ये ही आघाडी कुठे उभी आहे, हे पाहिल्यास यावेळी दिल्लीमध्ये रोमांचक लढत होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये भाजपाने दिल्लीत ५६.९ टक्के मतं मिळवताना  सर्वच्या सर्व सातही जागांवर कब्जा केला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या उमेदवारांना मिळालेली मतं ही काँग्रेस आणि आपच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक होती. त्या निवडणुकीत काँग्रेसला २२.६ आणि आम आदमी पक्षाला १८.२ टक्के मतं मिळाली होती. याची एकत्रित बेरीज ही ४०.८ टक्के होते. ती भाजपाला मिळालेल्या मतांपेक्षा खूप कमी होती. दिल्लीतील ७ पैकी ५ लोकसभा मतदारसंघात काँग्रेस तर २ मतदारसंघामध्ये आप दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती. आता २०२४ मध्येही मतदारांनी अशाच प्रकारे मतदान केल्यास काँग्रेस आणि आप एकत्र आले तरी त्याचा भाजपावर फारसा परिणाम होणार नाही. तसेच आप आमि काँग्रेसला २०१९ प्रमाणे एकही जागा मिळणार नाही.

मात्र जर दिल्लीतील मतदारांनी २०१४ प्रमाणे मतदान केल्यास भाजपाची वाट अवघड होणार आहे. २०१४ मध्ये भाजपाने सगळ्या जागा जिंकल्या असल्या तरी त्यावेळी भाजपाला ४६.६ टक्के मतं मिळाली होती. आप ३३.१ टक्के मतांसह दुसऱ्या आणि १५.२ टक्के मतांसह काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. आप आणि काँग्रेसच्या मतांची टक्केवारी ही ४८.२ एवढी होती. आताही अशाच प्रकारे मतदान झाल्यास भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागू शकते. 

२०१४ मध्ये केवळ पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाला मिळालेल्या मतांची बेरीज ही आप आणि कांग्रेसच्या उमेदवारांनी मिळालेल्या मतांपेक्षा अधिक होती. तर उर्वरित ६ मतदारसंघांत भाजपाच्या विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा आप आणि काँग्रेसला मिळालेल्या एकूण मतांची बेरीज अधिक होती.  

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपाAAPआपcongressकाँग्रेस