शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 18:57 IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर होईल.

Lok Sabha Election 2024 : उद्या, म्हणजेच 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मतदारानंतर लगेच सायंकाळी एक्झिट पोल जाहीर होतील. विविध राजकीय पक्षांसोबतच सर्वसामान्य नागरिकही यावर विशेष लक्ष ठेवून आहेत. विविध वृत्तवाहिन्यांवर पक्षाचे नेते या एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होत असतात. पण, यंदा या एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही. 

एखाद्या पक्षाला निवडणुकीत किती जागा मिळू शकतात, याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये दिला जातो. विविध एजन्सी ही आकडेवारी जाहीर करतील. आकडेवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते विविध वृत्त वाहिन्यांच्या चर्चेत सहभागी होऊन आपल्या पक्षाची बाजू मांडतात. पण, यंदा या एक्झिट पोलच्या चर्चेत पक्ष सहभागी होणार नाही, असा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतला आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.

काँग्रेसला विजयाचा विश्वासदरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल इंडिया आघाडीच्या बाजूने लागतील, असा काँग्रेसचा विश्वास आहे. एवढंच नाही तर पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांचा दावा आहे की, 4 जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीएचे अनेक मित्रपक्ष इंडिया आघाडीत सहभागी होतील. ते म्हणाले की, दोन टप्प्यांनंतरच इंडिया आघाडीला बहुमत मिळाले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, यूपी, बिहार, तेलंगणा, हरियाणा या राज्यांमध्ये काँग्रेसने यावेळी चांगली कामगिरी केली आहे, असा दावाही त्यांनी कला आहे. 

शेवटच्या टप्प्यात या दिग्गजांचे भवितव्य ठरणार लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. यामध्ये 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 57 जागांवर मतदान होणार आहे. पंतप्रधान मोदी, रवी किशन, अनुराग ठाकूर, अभिषेक बॅनर्जी, मनीष तिवारी, रविशंकर प्रसाद, चरणजीत सिंह चन्नी, मीसा भारती आणि हरसिमरत कौर बादल यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य उद्या ठरणार आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी