शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 18:37 IST

Lok Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीवेळी मला तुरुंगात ठेवल्यास आम आदमी पक्ष हा कुठलाही प्रचार न करता दिल्लीमधील ७० पैकी ७० जागांवर जिंकून येईल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. 

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली होती. मात्र जवळपास ५२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. पण या जामिनाची मुदत आता संपूत असून, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने अरविंद केजरीवाल यांना २ जून रोजी पुन्हा एकदा तुरुंगात जावं लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभेची निवडणूक होणार असून, त्या निवडणुकीवेळी अरविंद केजरीवाल हे तुरुंगात राहिल्यास आम आदमी पक्षासमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं. यादरम्यान, विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याला तुरुंगात ठेवल्यास आम आदमी पक्ष हा कुठलाही प्रचार न करता दिल्लीमधील ७० पैकी ७० जागांवर जिंकून येईल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. 

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा न देण्याच्या मुद्द्यावर सांगितलं की, मला कधीही पद किंवा खुर्चीचा मोह नव्हता. जेव्हा मी इन्कम टॅक्स विभागात कमिश्नर होतो. तेव्हा एका दिवसात नोकरीचा राजीनामा देऊन आलो होतो. त्यानंतर झोपडपट्ट्यांमधून काम काम केलं. त्यावेळी पक्ष स्थापन करायचा, निवडणूक लढवायची, अशी कुठलीही योजना नव्हती. पुणे अण्णांचं आंदोलन झालं. त्यानंतर पक्ष स्थापन केला, निवडणूक लढवून मुख्यमंत्री झालो,  मुख्यमंत्री झाल्यानंतर ४९ दिवसांनी स्वत:च्या मूल्यांसाठी मी राजीनामा दिला. तेव्हा माझ्याकडे कुणी राजीनामा मागितला नव्हता. तर मी स्वत: खुर्चीला लाथ मारली होती,असं अरविंद केजरीवाल म्हणाले.   

मात्र आज मी खुर्ची सोडत नाही आहे. कारण हा माझ्या संघर्षाचा भाग आहे. आम आदमी पक्षाला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करू शकत नाही हे नरेंद्र मोदींना ठावूक आहे. आम्ही एकदा ६७ तर दुसऱ्यांदा ६२ जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांनी आता नवा कट रचला. केजरीवाल यांना बनावट केसमध्ये अडचवायचं आणि अटक करायची.0 मत ते राजीनामा देतील आणि सरकार कोसळेल.  मी जर आज राजीनामा दिला, तर हा प्रयोग आणखी काही राज्यांमध्ये केला जाईल. मग पुढचा नंबर ममता बॅनर्जींचा असेल. मग पिनराई विजयन यांचा नंबर लागेल. मग स्टॅलिन रांगेत असतील. त्यामुळे जोपर्यंत जामीन मिळत नाही तोपर्यंत तुरुंगातून सरकार चालवायचं, असं मॉडेल मी उभं केलं तर पुढे कुठल्याही मुख्यमंत्र्याला हात लावायची यांची हिंमत होणार नाही, असा दावा केजरीवाल यांनी केला. 

ते पुढे म्हणाले की, केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवा, अशी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. मात्र  सर्वोच्च न्यायालयाने असा कुठला कायदा नाही, त्यामुळे आम्ही त्यांना हटवू शकत नाही, असे सांगितले.   आता मीच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. तसेच मी तुरुंगात आहे. मुख्यमंत्री असल्याने मला माझी कर्तव्य पूर्ण करण्यासाठी अधिकार देण्यात यावेत. तसेच तुरुंगात सुविधा देण्यात याव्यात, ज्यामुळे मी जामीन मिळेपर्यंत मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकेन, अशी मागणी करणार आहे.

दरम्यान, पुढील दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, जर यांनी मला दिल्लीच्या निवडणुकीवेळी तुरुंगात ठेवलं. तर कुठलाही प्रचार न करता आम आदमी पक्षाच्या ७० पैकी ७० जागा निवडून येतील. तसेच भाजपाला एकही जागा मिळणार नाही. जनता सगळं पाहत आहे. तसेच ती खूप समजूतदार आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाdelhiदिल्ली