शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

तिसऱ्या टर्ममध्ये भ्रष्टाचारावर आणखी कठोर कारवाई होणार; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 14:53 IST

'आम्ही म्हणतो भ्रष्टाचार हटवा, पण विरोधक म्हणतात भ्रष्टाचार वाचवा. '

Lok Sabha Election 2024 And Narendra Modi : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. मेरठनंतर पंतप्रधानांनी उत्तराखंडच्या रुद्रपूर आणि उधम सिंह नगरमध्ये जाहीर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसवर जोरदार टीका केली. गेल्या 10 वर्षातील विकास हा तर फक्त ट्रेलर आहे. आता देशाला अजून खूप पुढे न्यायचे आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भ्रष्टाचाराविरोधात कारवाई सुरुच राहणार...उत्तराखंडमध्ये येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तराखंडमधी ही पहिलीच सभा होती. या सभेतून मोदींनी भ्रष्टाचाराबाबत विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच, भ्रष्टाचाराविरोधात सरकारची कारवाई सुरुच राहणार असल्याचा इशाराही दिला. याशिवाय, आम्हाला उत्तराखंडला कोणत्याही किंमतीत विकसित राज्य बनवायचे आहे, यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज उत्तराखंडमध्ये ज्या वेगाने विकास होतोय, तो स्वातंत्र्यानंतर कधीही झाला नव्हता, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले. 

काँग्रेसवर हल्लाबोलपंतप्रधान मोदींनी कचठेवू बेटावरुन पुन्हा एकदा काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. देशाच्या सीमांचे रक्षण करणे, हे आपले कर्तव्य आहे. आम्ही म्हणतो भ्रष्टाचार हटवा, पण आमचे विरोधक म्हणतात भ्रष्टाचार वाचवा. भ्रष्टाचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. आमच्या तिसऱ्या टर्ममध्ये भ्रष्टाचारावर आणखी कठोर हल्ला केला जाईल, ही मोदींची हमी आहे, असे मोदी म्हणाले. यासोबतचत राहुल गांधींच्या भडकाऊ वक्तव्यावर टीका केली. अशा वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडते, असे ते म्हणाले.

काँग्रेसने तुकडे पाडणाऱ्याला तिकीट दिलेकाँग्रेसला देशभक्तीचा विचार मान्य नाही. काँग्रेस तुष्टीकरणाच्या दलदलीत इतकी बुडाली आहे की, देशाचा विचारही करू शकत नाही. विरोधत दहा वर्षांपासून सत्तेच्या बाहेर आहेत, त्यामुळे आग लावण्याची भाषा करताहेत. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दक्षिण भारत वेगळा करण्याची भाषा केली. देशाची फाळणी करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी की, नाही ते तुम्हीच सांगा. अशा लोकांचा या निवडणुकीत सफाया करा, अशी टीकाही मोदींनी यावेळी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसUttarakhand Lok Sabha Election 2024उत्तराखंड लोकसभा निवडणूक निकाल २०२४