शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 21 राज्यांतील 102 जागांवर 19 एप्रिलला मतदान; महाराष्ट्रात कुठेकुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 20:10 IST

lok sabha election 2024 1st phase : 8 केंद्रीय मंत्री, 2 माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालासह 1626 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार बुधवारी (१७ एप्रिल) सायंकाळी संपला. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे. देशातील 21 राज्यांमध्ये लोकसभेच्या 102 जागांसाठी हे मतदान होणार असून 8 केंद्रीय मंत्री, 2 माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालासह 1626 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या राज्यांमध्ये होणार मतदान - 19 एप्रिलला, उत्तर प्रदेशातील आठ, राजस्थानातील 13, मध्य प्रदेशातील सहा, आसाममधील पाच, बिहारमधील चार, महाराष्ट्रातील पाच, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एक, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमधील प्रत्येकी दोन, त्रिपुरामधून एक, उत्तराखंडमधील सहा, तामिळनाडूमध्ये 39, पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, अंदमान आणि निकोबार, मिझोराम, पुडुचेरी, मणिपूर आणि लक्षद्वीपमध्ये मतदान होणार आहे.

पहिल्या टप्प्यात हे दिग्गज मैदानात- महाराष्ट्रातील नागपूर मतदार संघातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अरुणाचल पश्चिम मतदारसंघातून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आपले नशीब आजमावत आहेत. येथे त्यांची फाईट माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या सोबत आहे. तर आसामच्या दिब्रूगड लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल निवडणुकीच्या मैदानात आहेत.

महाराष्ट्रात कुठे होणार पहिल्या टप्प्यातील मतदान? -

  • नागपूर -

नितीन गडकरी (भाजप) वि. विकास ठाकरे (काँग्रेस)

  • चंद्रपूर

सुधीर मुनगंटीवार (भाजप) वि. प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)

  • रामटेक- 

राजू पारवे (शिंदे गट) वि. श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)

  • भंडारा गोंदिया -

सुनील मेंढे (भाजप) वि. प्रशांत पडोळे (काँग्रेस)

  • गडचिरोली-चिमूर - 

अशोक नेते  (भाजप) वि. नामदेव किरसान (काँग्रेस)

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Vidarbhaविदर्भ