शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे ११६ उमेदवार इतर पक्षांतून आलेले, यूपीमध्ये सर्वाधिक दलबदलूंना संधी, तर महाराष्ट्रात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 08:05 IST

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने आतापर्यंत ४०० हून अधिक उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. सलग तिसऱ्यांदा सरकार बनवण्यासह मित्रपक्षांसोबत ४०० हून अधिक जागा जिंकण्याचे सत्ताधारी पक्षाचे लक्ष्य असून, ते गाठण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

 नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने आतापर्यंत ४०० हून अधिक उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. सलग तिसऱ्यांदा सरकार बनवण्यासह मित्रपक्षांसोबत ४०० हून अधिक जागा जिंकण्याचे सत्ताधारी पक्षाचे लक्ष्य असून, ते गाठण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळेच पक्षाने आयात नेत्यांना तिकीट देण्यासही संकोच केलेला नाही. भाजपचे तब्बल २८ टक्के उमेदवार दुसऱ्या पक्षांतून आलेले आहेत. 

आतापर्यंत भाजपने ४१७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यापैकी एकूण ११६ उमेदवार दुसऱ्या पक्षांतून भाजपमध्ये सामील झालेले आहेत.देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. तेथे आतापर्यंत ६४ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यातील २० जागांवर निवडणुकीपूर्वी अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केवळ या राज्यातच नाही तर तामिळनाडूत ११, पश्चिम बंगाल व ओडिशात प्रत्येकी आठ व महाराष्ट्रात सात आयाराम-गयारामांना भाजपने तिकीट दिले आहे.

२१ राज्यांत पक्षांतर करून आलेल्यांना  देण्यात आले तिकीट- भाजपने १८ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांत अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांना तिकीट दिले आहे. पक्षाच्या ४१७ उमेदवारांपैकी ११६ जणांनी अलीकडेच पक्षात प्रवेश केला आहे. - तब्बल २७.८२ टक्के उमेदवार मूळ भाजपचे नाहीत. पुद्दुचेरीत पक्षाचा एकमेव उमेदवार दुसऱ्या पक्षाचा आहे. - त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशात पक्षाचे ६ पैकी ५ उमेदवार पक्षांतर करून आलेले आहेत. तेलंगणात भाजपने १७ उमेदवार उभे केले असून, त्यापैकी १२ जण दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत.

सहा राज्यांत ५० टक्के आयात उमेदवारसहा राज्यांत भाजप पक्षांतर करून आलेल्या नेत्यांवर अवलंबून आहे. आंध्र प्रदेशात ८३ टक्के, दादरा आणि नगर हवेली, हरयाणात ६० टक्के, पुद्दुचेरीत १०० टक्के, तेलंगणात ७०.५९ टक्के आणि पंजाबमधील ६६ टक्के उमेदवार निवडणुकीपूर्वी अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४