शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मौलाना आझाद यांच्या जागी जिनांचं नाव आलं; शॉटगनचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 14:27 IST

काँग्रेस नेते आणि बिहारच्या पटना साहिब मतदारसंघाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी देशाच्या स्वातंत्र्यात आणि विकासात जिनांचे महत्त्वाचे योगदान असल्याचं म्हटलं होतं. आपण चुकून असं म्हटल्याची माहिती शत्रुघ्न सिन्हा यांनीच दिली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते आणि बिहारच्या पटना साहिब मतदारसंघाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी देशाच्या स्वातंत्र्यात आणि विकासात जिनांचे महत्त्वाचे योगदान असल्याचं म्हटलं होतं. मौलाना आझाद यांचं नाव घेण्याऐवजी चुकून मोहम्मद अली जिना म्हटल्याचं सिन्हा यांनी म्हटलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी 'मला काल मौलाना आझाद असं म्हणायचं होतं मात्र मोहम्मद अली जिना चुकून बोलून गेलो' असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि बिहारच्या पटना साहिब मतदारसंघाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी देशाच्या स्वातंत्र्यात आणि विकासात जिनांचे महत्त्वाचे योगदान असल्याचं म्हटलं होतं. आपण चुकून असं म्हटल्याची माहिती शत्रुघ्न सिन्हा यांनीच दिली आहे. मौलाना आझाद यांचं नाव घेण्याऐवजी चुकून मोहम्मद अली जिना म्हटल्याचं सिन्हा यांनी म्हटलं आहे. 

शत्रुघ्न सिन्हा यांनी 'मला काल मौलाना आझाद असं म्हणायचं होतं मात्र मोहम्मद अली जिना चुकून बोलून गेलो' असं म्हटलं आहे. 'काँग्रेस हा महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जिना आणि जवाहरलाल नेहरु यांचा पक्ष असून देशाचे स्वातंत्र्य आणि विकासामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते आणि त्यामुळेच मी या पक्षात आलो आहे' असं  शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं होतं.मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे शुक्रवारी (26 एप्रिल) एका प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. 

शत्रुघ्न सिन्हा यांनी मोहम्मद अली जिना यांची स्तुती केली होती. काँग्रेस हा जिना यांचा पक्ष आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या विकासात त्यांचाही सहभाग आहे असं सिन्हा यांनी म्हटलं होतं. 'काँग्रेसने देशासाठी मोठे योगदान दिल्यानेच मी काँग्रेसमध्ये आलो आहे. यानंतर पुन्हा कुठेही जाणार नाही. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो आणि पक्षापेक्षा देश मोठा असतो. देशापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. मोदींनी जेव्हा नोटाबंदीनंतर जीएसटी लागू केला तेव्हा तो आंबट लिंबावर कारलं खायला दिल्यासारखं होतं, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं होतं. 

 

भाजपामध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या शत्रुघ्न सिन्हांनी काही दिवसांपूर्वी  काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेश करताना त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता. भाजपा पक्ष हा लोकशाहीवर नव्हे, तर हुकूमशाहीवर चालतो. भाजपामध्ये वरिष्ठ नेत्यांचा अपमान केला जातो असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं होतं. शत्रुघ्न सिन्हा यांनी बिहार काँग्रेस प्रभारी शक्ती सिंह गोहिल यांना भाजपाचे प्रभारी म्हटलं होतं. त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळताना त्यांनी बिहार आणि गुजरातमध्ये भाजपाचा असलेला पाठीचा कणा, असं गोहिलांना उद्देशून म्हटलं होतं. परंतु तात्काळ त्यांची चूक उपस्थित काँग्रेसच्या नेत्यांनीही लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी आपल्याच अंदाज स्पष्टीकरणही दिलं होतं. आज भाजपाचा स्थापना दिवस आहे आणि मी इथे नवीन खेळाडू आहे. तेव्हा असं होणारच. इथे उपस्थित सर्वच सज्ञान आहे, त्यामुळे ते मला समजून घेऊ शकतात असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते. काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना पक्षाने पाटणा-साहिब येथून उमेदवारी दिली. त्यामुळे पाटणा-साहिब लोकसभा मतदारसंघामध्ये आता भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात लढत रंगणार आहे.  

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक