lok sabha election 2019 Sadhvi Pragya Singh Thakur against former police officer's | साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधात माजी पोलीस अधिकारी रिंगणात
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधात माजी पोलीस अधिकारी रिंगणात

मुंबई  - मुंबईवर झालेल्या २६/११ हल्यातील शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मालगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरुद्ध एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने एल्गार पुकारला आहे. रियाजउद्दीन देशमुख असं या निवृत्त अधिकाऱ्याचे नाव असून देशमुख यांनी भोपाळमधून प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  देशमुख सध्या औरंगाबादमध्ये वास्तव्यास आहे. 

एक आदर्श आणि देशभक्‍त अधिकारी म्हणून करकरे यांची ओळख होती. त्यांच्या नेतृत्वात काम केल्याचा आपल्याला अभिमान वाटतो, असं देशमुख सांगतात. मात्र अशा अधिकाऱ्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या व्यक्तीला भाजपकडून उमेदवारी देण्यात येते, हे दुर्दैवी असल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे.  आपल्या शापामुळेच हेमंत करकरेंचा मृत्यू झाल्याचे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले होते.  

दरम्यान करकरेंना आपण गुरू मानतो. मृत्यूनंतर त्यांचा अपमान झाल्याचे दुख: वाटते. भोपाळमधून निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरलो असून लोकशाही मार्गाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा आपण विरोध करणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. 

२३ एप्रिल रोजी सहकुटुंब भोपाळला जाऊन देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २४ एप्रिल रोजी पडताळणी होऊन त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला आहे. शहीद हेमंत करकरे यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी साध्वींना लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा निश्चय देशमुख यांनी केला आ


Web Title: lok sabha election 2019 Sadhvi Pragya Singh Thakur against former police officer's
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.