शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला जबरदस्तीनं करायला लावलं 'हाता'ला मतदान, इराणींचा राहुल गांधींवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 12:16 IST

अमेठी मतदारसंघात बळजबरीने राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदान केंदावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी केला आहे.

ठळक मुद्देअमेठी मतदारसंघात बळजबरीने राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदान केंदावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी केला आहे. काँग्रेसला मतदान करण्यासाठी आपल्यावर सक्ती करण्यात आली असल्याचा आरोप एका महिलेने या व्हिडीओमध्ये केला.लोकसभा निवडणुकीसाठी आज सात राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.

नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकीसाठी आज सात राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदानाची ही पाचवी फेरी असून, त्यामध्ये 674 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. 8 कोटी 75 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. अमेठी मतदारसंघात बळजबरीने राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदान केंदावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी केला आहे. स्मृती इराणी यांनी याबाबतचा एक व्हिडीओही ट्वीट केला आहे. काँग्रेसला मतदान करण्यासाठी आपल्यावर सक्ती करण्यात आली असल्याचा आरोप एका महिलेने या व्हिडीओमध्ये केला आहे. 

महिलेने 'माझा हात पकडून जबरदस्तीने काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेले बटण दाबायला लावले. मला भाजपाला मतदान करायचे होते' असे व्हिडीओमध्ये म्हटले आहे. या घटनेनंतर स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच प्रशासन आणि निवडणूक आयोगाला सर्तक करण्यासाठी मी हा व्हिडिओ ट्वीट केला. ते कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. राहुल गांधींना अशा प्रकारच्या राजकारणासाठी शासन करायचे की नाही ते या देशातील जनतेला ठरवायचे आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. 

अमेठीत मतदान केंद्र बळकावण्याचा प्रकार, स्मृती ईराणींचा राहुल गांधींवर आरोपकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानात यंत्रबंद होणार आहे.  या फेरीमध्ये महिला उमेदवारांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहे. या टप्प्यामध्ये सुमारे साडेतीन लाख मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या टप्प्यामध्ये संपुआच्या अध्यक्षा सोनिया गांधी, कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, राज्यवर्धन राठोड, जयंत सिन्हा, स्मृती इराणी, अर्जुन मेघवाल, राजीव प्रताप रुडी हे प्रमुख मैदानामध्ये आहेत. या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14 जागांवर लढाई होत असून, त्यातील 12 जागा भाजपाच्या ताब्यात होत्या. सपा-बसप-आरएलडीच्या आघाडीनंतर बदललेल्या स्थितीत या जागा राखणे हे भाजपासमोर आव्हान असेल.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamethi-pcअमेठीBJPभाजपाSmriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस