शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

नरेंद्र मोदींचा नवा 'NARA', देशाला सांगितली 'मोदी सरकार -२'ची दिशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 20:52 IST

समृद्ध भारत हे नवं जनआंदोलन उभं करायचं आहे आणि विकसनशील देश हे लेबल हटवायचं आहे. - नरेंद्र मोदी

ठळक मुद्देराष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड झाली.राष्ट्रविकास हे आपलं ध्येय आहेच, पण त्यासोबत प्रादेशिक अस्मिता जपणं, जोपासणं हेही गरजेचं आहे.२०१४ मध्ये 'स्वच्छ भारत'चा नारा देणाऱ्या मोदींनी यावेळी 'समृद्ध भारता'चा इरादा बोलून दाखवला आहे. 

पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करून पुन्हा विक्रमी बहुमत मिळवून पंतप्रधानपदाची शपथ घ्यायला सज्ज झालेल्या नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या सरकारचा नवा 'नारा' जाहीर केला.  National Ambition, Regional Aspiration - अर्थात राष्ट्रीय आकांक्षा आणि प्रादेशिक अस्मिता यांचा मेळ घालून समृद्ध भारत हे नवं जनआंदोलन उभं करायचं आहे आणि विकसनशील देश हे लेबल हटवायचं आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.    

संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड झाली. पंतप्रधानपदासाठी तब्बल ३५३ खासदारांनी त्यांना एकमुखाने पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर केलेल्या विस्तृत भाषणात, मोदींनी ज्येष्ठांबद्दल आदर व्यक्त केला, जनतेचे आभार मानले, नव्या खासदारांना मार्गदर्शन केले, जुन्या खासदारांचे कान टोचले आणि आपल्या सरकारची दिशा काय असेल, हेही सांगितले. २०१४ मध्ये 'स्वच्छ भारत'चा नारा देणाऱ्या मोदींनी यावेळी 'समृद्ध भारता'चा इरादा बोलून दाखवला आहे. 

>> देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणं अपरिहार्य आहे. एनडीए हे एक विश्वस्त आंदोलन आहे. हा प्रयोग आणखी सशक्त करायचा आहे. एकट्या भाजपाचे ३०३ खासदार निवडून आले असतानाही मी हे बोलतोय, कारण ते आवश्यक आहे.

>> राष्ट्रविकास हे आपलं ध्येय आहेच, पण त्यासोबत प्रादेशिक अस्मिता जपणं, जोपासणं हेही गरजेचं आहे.

>> एनर्जी आणि सिनर्जी या रसायनाच्या जोरावरच एनडीए सामर्थ्यशाली झाली आहे.  

>> अल्पसंख्यांकांच्या मनातील काल्पनिक भीती घालवणे हे मुख्य आव्हान आहे. 

>> सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास, हे ब्रीद घेऊन काम करायचं आहे.  

>> घरातील उपासना पद्धती कुठलीही असो, बाहेर पडल्यानंतर भारत देश हीच आपली माता आहे.

>> जीव मे ही शिव है. जनसेवा हीच ईश्वरसेवा, याहून देशहिताचा दुसरा मार्ग असू शकत नाही. 

>> सत्ताभाव, सत्तेची हाव जनता स्वीकारत नाही. याउलट, सेवाभावापुढे ती नतमस्तक होते. 

>> समृद्ध भारत हे नवे जनआंदोलन असेल. 'विकसनशील देश' हे लेबल हटवायचं आहे.

>> अनेक प्रस्थापितांना पराभूत करून आल्याचा गर्व बाळगू नका. तुम्ही मोदींमुळे निवडून आलेला नाहीत, तर जनतेच्या आदेशामुळे निवडून आला आहे. जनतेच्या मतांचा सन्मान करा. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदी