शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : 'पहले मतदान, फिर जलपान!', पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 10:13 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. खासकरुन तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना मोठ्या संख्येने घराबाहेर पडा अशी विनंती त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. खासकरुन तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना मोठ्या संख्येने घराबाहेर पडा अशी विनंती त्यांनी केली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे.

नवी दिल्ली - लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. खासकरुन तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना मोठ्या संख्येने घराबाहेर पडा अशी विनंती त्यांनी केली आहे.

'लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात नक्की सहभागी व्हा अशी माझी सर्वांना विनंती आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदान करा. खासकरुन तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडा. पहले मतदान फिर जलपान' असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 

17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागत आहेत. 

Lok Sabha Election Voting: गुगलकडून डुडलद्वारे लोकशाहीचा सन्मान, भारतीयांना मतदान करण्याचं आवाहनगुगलनेही डुडलद्वारे भारतीयांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. देशातील लोकशाहीच्या महापर्वाची दखल गुगल या जगप्रसिद्ध सर्ज इंजिनने घेतली आहे. गुगलने डुडलद्वारे मतदान करण्याचे आणि मतदान करण्याची प्रकिया समजावून सांगितली आहे. गुगलच्या इंग्रजी अक्षरातील तिसऱ्या क्रमांकाचे O (ओ) हे अक्षर गुगलने मतदानरुपी दर्शवले आहे. त्यामध्ये, डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावल्याचे दिसत आहे. 

Video : पहिला माझा नंबर, 'राष्ट्रसुरक्षा अन् एकात्मतेसाठी मतदान करा'

सर्वांनी मतदान करायला हवं, राष्ट्राची सुरक्षा आणि एकात्मतेसाठी मतदान करायला हवं. निवडणूक आयोगही म्हणतं, आम्हीही तेच म्हणत असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. स्वर्गीय भाऊजी दफ्तर उच्च प्राथमिक शाळेच्या संघ बिल्डिंगमागील मतदान केंद्रात भागवत यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भागवत हे सकाळी लवकरच मतदान केंद्रावर पोहोचले  होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वप्रथम मतदान केले आहे. त्यासाठी सकाळी-सकाळीच ते मतदान केंद्रावर हजर झाले होते. येथील मतदान केंद्रावर मतदानाचा पहिला हक्कही त्यांनीच बजावला. मतदानासाठी पहिला माझा नंबर हेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. विशेष म्हणजे, मतदान केल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना प्रत्येकाने मतदान करायला हवं, मतदान कराच असा संदेशही भागवत यांनी देशातील नागरिकांना दिला आहे. राष्ट्राची सुरक्षा आणि एकात्मतेसाठी सर्वांनी मतदान करायलाच हवं. निवडणूक आयोगही सांगतं, आम्हीही तेच म्हणत असल्याचं भागवत यांनी म्हटलं आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtraमहाराष्ट्रNarendra Modiनरेंद्र मोदी