परीक्षा केंद्राजवळ मोदींची सभा; थर्माकोल लावून कॉलेजला केले 'साउंडप्रुफ'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 12:05 PM2019-03-28T12:05:53+5:302019-03-28T12:06:19+5:30

महाविद्यालयातील वर्गांना बाहेरच्या बाजूने प्लायवूड लावून बंद करण्यात आले आहे. तर आतल्या बाजुने थर्माकोल लावण्यात आले आहे

Lok Sabha Election 2019 Modi's rally in meerut near the examination center | परीक्षा केंद्राजवळ मोदींची सभा; थर्माकोल लावून कॉलेजला केले 'साउंडप्रुफ'

परीक्षा केंद्राजवळ मोदींची सभा; थर्माकोल लावून कॉलेजला केले 'साउंडप्रुफ'

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेरठ येथून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. येथील सिवाया येथे पंतप्रधान मोदी सभा घेणार आहेत. ज्या मैदानावर मोदींची सभा सुरू आहे, तेथून जवळच असलेल्या सटे भगवती महाविद्यालयात शेकडो विद्यार्थी सीसीएस व्हीव्ही परिक्षा देत आहेत. या विद्यर्थ्यांना अडचण होऊ नये, यासाठी महाविद्यालयातील खोल्यांना थर्माकोल लावून साउंडप्रुफ करण्यात आले आहे.

महाविद्यालयातील वर्गांना बाहेरच्या बाजूने प्लायवूड लावून बंद करण्यात आले आहे. तर आतल्या बाजुने थर्माकोल लावण्यात आले आहे. तसेच सभेच्या वेळी अधिक आवाज येऊ नये यासाठी खिडक्यांवर चार-चार पडदे लावण्यात आले आहे. या व्यतिरिक्त गॅलरी, स्टाफ रुम, एचओडी रुम देखील साउंडप्रुफ करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांना सभेतील साउंड टेस्ट केला आहे.

साउंडप्रुफ उपाययोजना पडणार अपुऱ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत उच्च प्रतिचे साउंड स्पिकर लावण्यात आले आहे. याचा सभेच्या वेळी मोठा आवाज होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या खोल्यामध्ये करण्यात आलेल्या साउंडप्रुफ उपाययोजना कमी पडणार आहे. या व्यतिरिक्त महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर वायुसेनेचे तीन हेलिकॉप्टर उतरणार आहेत. त्यांच्या लँडिंगमुळे देखील मोठा आवाज होणार आहे. यामुळे महाविद्यालायत करण्यात आलेल्या उपाययोजना अपुऱ्याच पडणार हे स्पष्टच आहे.

२०१४ मध्ये देखील मोदींनी मेरठमधूनच प्रचाराला सुरुवात केली होती. आता पुन्हा एकदा मोदी ऊस पट्ट्यातील शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. मेरठ मतदार संघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019 Modi's rally in meerut near the examination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.