शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सत्तांतर झाल्यास देशाचे पुढील अर्थमंत्री रघुराम राजन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 12:27 IST

'न्याय' योजना अर्थात गरीब कुटुंबाला महिन्याला किमान १२ हजार रुपयांच्या उत्पन्नाच्या हमी योजनेची कल्पना आपणच काँग्रेसला दिली होती, असंही राजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राजन यांची जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि काँग्रेस यांच्यात जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे. रघुराम राजन यांनी आपण भारतात परतण्यासाठी तयार असून योग्य संधीची वाट पाहात असल्याचे आधीच म्हटले आहे. आता 'न्याय' योजना अर्थात गरीब कुटुंबाला महिन्याला किमान १२ हजार रुपयांच्या उत्पन्नाच्या हमी योजनेची कल्पना आपणच काँग्रेसला दिली होती, असंही राजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राजन यांची जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

रघुराम राजन यांच्या सल्ल्यानंतर काँग्रसेने सत्तेत आल्यास देशातील गरिबांना वार्षिक ७२ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. त्यावरून राजन यांच्या अर्थनितीचा काँग्रेस फायदा घेणार असल्याचे समजते. तसेच सत्ता आल्यास देखील काँग्रेस राजन यांना सरकारमध्ये अर्थमंत्री पदाची जबाबदारी देऊ शकतं.

१९९१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली होती. त्यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थ खाते सोपविण्यात आले होते. त्यावेळी मनमोहन सिंग यांनी भारताला अर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठे योगदान दिले होते. त्यानंतर काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याकडे तब्बल दहा वर्षे देशाचे नेतृत्व सोपविले होते. आता देखील देश आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. त्यासाठी उत्तम अर्थतज्ज्ञांची भारताला गरज आहे. राजन हे अर्थतज्ज्ञ म्हणून सर्वांना परिचीत आहे. त्यामुळे त्यांना युपीएकडून अर्थमंत्री म्हणून प्रोजेक्ट केल्यास ते काँग्रेसच्या पथ्यावरच पडणार आहे.

सध्या राजन हे शिकागो युनिव्हर्सिटीतल्या 'बूथ स्कूल ऑफ बिजनेस'मध्ये व्यावसायिकतेचे धडे देत आहेत. इतिहास पाहिल्यास तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपासारखे महागठबंधनमधील विरोधी पक्ष सत्तेवर आल्यास रघुराम राजन यांना अर्थमंत्री बनण्याची संधीही मिळू शकते. परंतु, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच राजन यांच्या संभाव्य संधीचा उलगडा होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaghuram Rajanरघुराम राजनcongressकाँग्रेस