शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

मतदान सुरू असताना हॉटेलमध्ये ईव्हीएम सापडल्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 12:45 PM

बिहारच्या मुजफ्फरपूरमधला प्रकार

पाटणा: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान काल पार पडलं. यावेळी बिहारमधल्या मुजफ्फरपूर लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असताना एका हॉटेलमध्ये चार ईव्हीएम सापडल्यानं एकच खळबळ उडाली. या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे. सेक्टर मॅजिस्ट्रेट अवधेश कुमार हॉटेलमध्ये सापडलेल्या ईव्हीएमचे संरक्षक होते. माझ्याकडे 4 ईव्हीएम मशीन होत्या. एखाद्या मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यास या अतिरिक्त ईव्हीएमचा वापर केला जाणार होता, असं स्पष्टीकरण कुमार यांनी दिलं. 'गाडीच्या चालकाला जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं होतं. त्यामुळे मी ईव्हीएम घेऊन गाडीतून उतरलो आणि एका हॉटेलमध्ये थांबलो,' असं कुमार यांनी सांगितलं. हॉटेलमध्ये ईव्हीएम असल्याची माहिती आसपास पसरताच एकच गोंधळ उडाला. हे वृत्त मतदान केंद्रावर पोहोचताच आणखी गदारोळ झाला. यानंतर स्थानिक एसडीओ कुंदन कुमार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चारही ईव्हीएम ताब्यात घेतल्या. मुजफ्फरपूरचे जिल्हाधिकारी आलोक रंजन घोष यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. याशिवाय अवधेश कुमार यांना बेजबाबदारपणाबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली. ईव्हीएम हॉटेलमध्ये कशा पोहोचल्या, याबद्दल खुलासा करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019muzaffarpur-pcमुजफ्फरपूरVotingमतदान