शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मसूद अजरला शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राइकची गरज पडली नसती : दिग्विजय सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 13:46 IST

पाकिस्तान मधील स्थायिक असलेल्या जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजरला जर प्रज्ञा सिंह यांनी शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरज पडली नसती, असा खोचक टोला दिग्विजय सिंह यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांना लागवला.

मुंबई - जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजरला शाप दिला असता तर भारताला सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरज पडली नसती, असे म्हणत भोपाळ मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांनी भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. भोपाळ येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

शहीद हेमंत करकरे यांना आपण शाप दिल्यानेच त्यांचा सर्वनाश झाला, असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. पाकिस्तान मध्ये लपवून  बसलेला जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजरला जर प्रज्ञा सिंह यांनी शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरज पडली नसती, असा खोचक टोला दिग्विजय सिंह यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांना लागवला.

दहशतवादी नरकात जाऊन जरी लपले, तरीही आम्ही त्यांना शोधून काढू असे देशाचे पंतप्रधान म्हणाले होते. पुलवमा, पठाणकोट आणि उरी मधील हल्ले झाल्यावर पंतप्रधान कुठे गेले असा सवाल दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला. भारतात नेहमीच होणाऱ्या दहशतवादी हल्ले कधी थांबतील अशी खंत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

माझी उमेदवारी जाहीर झाल्याने माजी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण घाबरले आहेत. उमा भारतींनी निवडणुकीत उतरण्यास नकार दिला. अखेर शेवटच्या दिवशी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उमेदवारी दाखल केली, अशा शब्दात दिग्विजय सिंह यांनी भाजपवर निशाणा साधला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDigvijaya Singhदिग्विजय सिंहSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाUma Bhartiउमा भारती