शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई लोकलमार्गे लोकसभा?; मोदी सरकारकडून 'लाईफलाईन'साठी ५४,७७७ कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 13:59 IST

मुंबई रेल्वेचा चेहरामोहराच बदलून, 'व्हेंटिलेटर'वरील जीवनवाहिनीला नवजीवन देण्यासाठी मोदी सरकारची मोठी घोषणा....

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं निवडणुकीआधीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत अपेक्षेप्रमाणे डझनभर निर्णय घेऊन लोकसभेसाठी मतपेरणी केली आहे. त्यात त्यांनी देशाच्या आर्थिक राजधानीला मोठी भेट दिलीय. मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या रेल्वेसाठी ५४ हजार कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला आहे. मुंबई रेल्वेचा चेहरामोहराच बदलून, 'व्हेंटिलेटर'वरील जीवनवाहिनीला नवजीवन देण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. परंतु, मुंबई लोकलचा 'ट्रॅक' वापरून लोकसभेत जाण्याचाच हा प्रयत्न दिसतोय.

मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी) फेज ३ ए अंतर्गत येणाऱ्या रेल्वे मार्गांचा विस्तार आणि आधुनिकीकरण या कामांसाठी रेल्वे मंत्रालयानं ५४,७७७ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला होता. त्याला मंजुरी देण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. हा खर्चात राज्य सरकारचाही वाटा असेल. 

एमयूटीपी ३ ए अंतर्गत प्रस्तावित कामं... 

>> सीएसएमटी - पनवेल मार्गावर फास्ट एलिव्हेटेड कॉरिडोर>> पनवेल - विरार नवी उपनगरीय सेवा>> गोरेगाव ते बोरिवली दरम्यान हार्बर मार्गाचा विस्तार>> बोरिवली ते विरार दरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन>> कल्याण-आसनगावदरम्यान चौथी लाईन>> कल्याण यार्ड>> रेल्वे स्टेशनांचं नूतनीकरण>> मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल >> तांत्रिक सक्षमीकरण

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Arun Jaitleyअरूण जेटलीNarendra Modiनरेंद्र मोदीrailwayरेल्वेMumbai Train Updateमुंबई ट्रेन अपडेटcentral railwayमध्य रेल्वे