शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप मंत्र्याला बेरोजगारीवरून जाब विचारणाऱ्याला पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 16:31 IST

 मी १० वर्षांपासून भाजपला मतदान देत आहे. तरीही मला नोकरी का मिळाली नाही. दर्शनच्या प्रश्नाने बैठकीत वातावरण चिघळले. दर्शनला त्यानंतर पोलिसांनी कलम १५१ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केलं. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीत तुम्ही तुमच्या मतदारसंघातील नेत्यांना प्रश्न विचारणार असेल तर थोड थांबा आणि ही बातमी वाचा. कारण,गोव्यातील एका तरुणाने नेत्याला प्रश्न विचारल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचारासाठी आलेल्या आरोग्यमंत्र्यांसमोर तरुणांने बेरोजगारीसंदर्भात आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मंत्र्यांना जाब का विचारला, यामुळे तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

गोवा उत्तर क्षेत्रातून लोकसभाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक रिंगणात आहे. १८ एप्रिलच्या संध्याकाळी वालपोई मतदारसंघातून त्यांच्या समर्थनात एक बैठक झाली. राज्य आरोग्य मंत्री विश्वजित राणेही उपस्थित होते. राणे हे यावेळी बैठकीत नागरिकांशी चर्चा करत होते.

आरोग्य मंत्री राणे नागिरकांशी बोलत असतानाच तिथे उपस्थित असलेल्यापैकी दर्शन गांवकर नावाच्या एका तरुणाने अचानक प्रश्न केला. मी १० वर्षांपासून भाजपला मतदान देत आहे. तरीही मला नोकरी का मिळाली नाही. दर्शनच्या प्रश्नाने बैठकीत वातावरण चिघळले. दर्शनला त्यानंतर पोलिसांनी कलम १५१ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केलं. 

जामिनावर सुटल्यानंतर दर्शनने माध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोग्य मंत्री यांना मी बैठकीत फक्त नोकरी बद्दल विचारले असता मला बैठक संपताच पोलिसांनी अटक केली. १० वर्षांपासून मी त्यांना पाठींबा देत असल्याचा सुद्धा त्याने सांगितले. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGoa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाjobनोकरीPoliceपोलिस