lok sabha election 2019 542 seats results to be announced as election in vellore gets cancelled | Lok Sabha Election Results 2019: ...म्हणून यंदा 543 नव्हे, तर 542 जागांचे निकाल जाहीर होणार
Lok Sabha Election Results 2019: ...म्हणून यंदा 543 नव्हे, तर 542 जागांचे निकाल जाहीर होणार

नवी दिल्ली: अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सतराव्या लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांचे निकाल जाहीर होतील. मात्र अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता आहे. पैशाचा बेसुमार वापर झाल्याचं सिद्ध झाल्यानं तमिळनाडूतील वेल्लूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाने रद्द केली. 

द्रमुक नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आल्यानं वेल्लूर मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला. आयकर विभागानं दिलेल्या अहवालानंतर निवडणूक आयोगानं हे पाऊल उचललं. एका सिमेंट गोदामातून तब्ल 11 लाखांची रोकड जप्त करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगानं राष्ट्रपतींनी पत्र लिहिलं. वेल्लूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्याची शिफारस आयोगाकडून करण्यात आली होती. यानंतर राष्ट्रपतींनी कायदा मंत्रालयाचं मत विचारात घेतलं. यानंतर राष्ट्रपतींनी वेल्लोरमधील निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला. 


Web Title: lok sabha election 2019 542 seats results to be announced as election in vellore gets cancelled
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.