Lockdown News: अनावश्यक गर्दी टाळत बँकामधून पैसे काढण्यासाठी आणली योजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 07:22 IST2020-05-04T01:59:15+5:302020-05-04T07:22:13+5:30
बॅँकांमधून पैसे काढण्यासाठी वेळापत्रक जाहीर

Lockdown News: अनावश्यक गर्दी टाळत बँकामधून पैसे काढण्यासाठी आणली योजना
नवी दिल्ली : बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी इंडियन बँक असोसिएशनने बँकांना ११ मे पर्यंतचे वेळापत्रक बनवून दिले आहे. मात्र एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध नसतील. खात्याच्या शेवटच्या क्रमांकानुसार ही योजना आहे.
खात्याचे शेवटचे क्रमांक | पैसे काढण्याचे दिनांक |
० आणि १ | ४ मे |
२ आणि ३ | ५ मे |
४ आणि ५ | ६ मे |
६ आणि ७ | ८ मे |
८ आणि ९ | ११ मे |