शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनमध्ये पूर्ण वेतन : सर्वोच्च न्यायालयाकडून गृहमंत्रालयाच्या आदेशाला स्थगिती, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 19:56 IST

पंजाबमधील लुधियानाच्या हँड टूल्स असोसिएशनने दावा केला, की आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार, 29 मार्चला गृह मंत्रालयाने दिलेला आदेश, संविधानाच्या अनुच्छेद 14, 19(1)(G), 265 आणि 300चे उल्लंघन आहे. तो वापस घेतला जायला हवा.

ठळक मुद्देयाचिकाकर्त्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005मधील कलम 10(2) (I)च्या संवैधानिक वैधतेला आव्हान दिले आहे.याचिकाकर्त्यांनी मागितली वेतनावर निर्णय घेण्याची सूटसर्वोच्च न्यायालयाने केंद्रकडून मागवले स्पष्टिकरण

नवी दिल्ली : कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात ज्या कंपन्या कामगारांना पूर्ण वेतन देण्यास असमर्थ आहेत, अशा कंपन्यांवर खटला चालवू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने शुक्रवारी प्रशासनाला हा आदेश दिला.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रकडून मागवले स्पष्टिकरण-न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, संजय किशन कौल आणि बी.आर. गवई यांच्या पिठाने, कामाचा मोबदला देऊ न शकणाऱ्या खासगी कंपन्यांविरोधात खटला चालवू नये, असा आदेश केंद्र आणि राज्यांना दिला आहे. याशिवाय न्यायालयाने औद्योगिक संघटनांच्या वतीने सादर केलेल्या याचिकांसंदर्भात केंद्राकडून स्पष्टिकरणही मागवले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 29 मार्चला एक परिपत्रक काढून, राष्ट्रव्यापी बंददरम्यान कर्मचाऱ्यांना पर्ण वेतन देण्यात यावे, असे निर्देश खासगी संस्थांना दिले होते.

आणखी वाचा -  CoronaVirus News : रोहिंग्या मुस्लिमांच्या सर्वात मोठ्या 'रिफ्यूजी कॅम्प'मध्ये घुसला कोरोना, येथे राहतात तब्बल 10 लाख लोक

याचिकाकर्त्यांनी मागितली वेतनावर निर्णय घेण्याची सूट - उत्पादन ठप्प असल्याने कामगारांचे वेतन करण्यासाठी आमच्याकडे कुठलाही पर्याय नाही, असा दावा करत संबंधित औद्योगिक संघटना न्यायालयात गेल्या आहेत. या याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे मागणी केली, की  कोरोनाव्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात त्यांच्या कामगारांना वेतन देण्यासंदर्भात पूर्णपणे सूट द्यावी. ही याचिका मुंबईतील एक कपड्याची कंपनी आणि 41 छोट्या संघटनांच्या पंजाबमधील एका समूहाच्या वतीने करण्यात आली होती.

आणखी वाचा - CoronaVirus News : वैज्ञानिक तयार करतायेत असा मास्क, जो कोरोना व्हायरसच्या संपर्कात येताच बदलेल रंग

घटनेतील विविध अनुच्छेदांचा दाखला - याचिकेत गृह मंत्रालयाचा 29 मार्चचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005मधील कलम 10(2) (I)च्या संवैधानिक वैधतेला आव्हान दिले आहे. पंजाबमधील लुधियानाच्या हँड टूल्स असोसिएशनने दावा केला, की आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार, 29 मार्चला गृह मंत्रालयाने दिलेला आदेश, संविधानाच्या अनुच्छेद 14, 19(1)(G), 265 आणि 300चे उल्लंघन आहे. तो वापस घेतला जायला हवा.

आणखी वाचा - आनंदाची बातमी : 'उवा' मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'या' औषधाने काही तासांतच केला कोरोनाचा 'खात्मा'!; क्लिनिकल ट्रायल सुरू

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयdelhiदिल्लीHome Ministryगृह मंत्रालयGovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकार