Lockdown: जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा २३ ऑगस्ट रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 04:16 IST2020-05-08T04:16:45+5:302020-05-08T04:16:58+5:30

ही घोषणा गुरुवारी केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने येथे केली.

Lockdown: JEE Advance Exam on 23rd August | Lockdown: जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा २३ ऑगस्ट रोजी

Lockdown: जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा २३ ऑगस्ट रोजी

नवी दिल्ली : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीत (आयआयटी) प्रवेशासाठीची जेईई अ‍ॅडव्हान्स (जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) परीक्षा येत्या २३ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.

ही घोषणा गुरुवारी केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने येथे केली. यापूर्वी ही परीक्षा १७ मे रोजी घेण्याचे जाहीर झाले होते; परंतु कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्यामुळे ती लांबणीवर टाकली गेली होती, असे मानव संसाधन विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक म्हणाले. जेईई (मेन्स) परीक्षा येत्या १८ ते २३ जुलैदरम्यान घेण्यात येईल, अशी घोषणा मंगळवारी सरकारने केली होती.

Web Title: Lockdown: JEE Advance Exam on 23rd August

टॅग्स :examपरीक्षा