Coronavirus : ...म्हणून लॉकडाऊन वाढवू शकत नाही, नितीन गडकरींनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 03:19 PM2020-05-14T15:19:45+5:302020-05-14T15:32:34+5:30

काहींनी चालून थकल्यामुळे प्राण सोडले, तर काही मजुरांना उपासमारीने किंवा महामार्गावरील अपघातामुळे प्राण गमवावे लागले, असंही गडकरी म्हणाले आहेत.

lockdown cannot be increased, as indicated by Nitin Gadkari vrd | Coronavirus : ...म्हणून लॉकडाऊन वाढवू शकत नाही, नितीन गडकरींनी दिले संकेत

Coronavirus : ...म्हणून लॉकडाऊन वाढवू शकत नाही, नितीन गडकरींनी दिले संकेत

Next
ठळक मुद्देकोरोनानं देशात थैमान घातलेलं असून, रुग्णसंख्यासुद्धा दिवसागणिक वाढत आहेत. कोरोनाच्या लढ्यात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदींनी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी NDTV या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे, त्यात त्यांनी मोठा खुलासा केला.

नवी दिल्लीः कोरोनानं देशात थैमान घातलेलं असून, रुग्णसंख्यासुद्धा दिवसागणिक वाढत आहेत. कोरोनाला थोपवण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या लढ्यात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदींनी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. त्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी NDTV या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे, त्यात त्यांनी मोठा खुलासा केला.

मार्चच्या उत्तरार्धात जेव्हा देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आलं, तेव्हा हजारो स्थलांतरित लोक पायी, सायकल किंवा ट्रकमधून आपापल्या गावी निघाले. अनेकांना घरापर्यंतचा प्रवास पूर्ण करता आलेला नाही, काहींनी चालून थकल्यामुळे प्राण सोडले, तर काही मजुरांना उपासमारीने किंवा महामार्गावरील अपघातामुळे प्राण गमवावे लागले, असंही गडकरी म्हणाले आहेत. आपण एक गरीब देश आहोत आणि महिनोन् महिने लॉकडाऊन वाढवू शकत नाही, असं म्हणत त्यांनी लॉकडाऊन वाढणार नसल्याचे संकेत दिले आहेत. 

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे प्रभारी मंत्री गडकरी म्हणाले की, या प्राणघातक विषाणूच्या भीतीने प्रवासी कामगार आपापल्या घरी गेले आहेत. व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यावर स्थलांतरित मजूर पुन्हा कामावर परत येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आम्ही कोरोनाविरुद्ध युद्ध तर लढत आहोतच,  आर्थिक युद्धही लढत आहोत, असेही ते म्हणाले. कोरोना व्हायरस लॅबमधूनच आला आहे. तो नैसर्गिक नव्हे, तर कृत्रिम व्हायरस आहे, असंही ते म्हणाले आहेत. कोरोना विषाणूसह जीवन जगण्याची कला आपण शिकली पाहिजे. कोरोना विषाणू प्रथम चीनच्या वुहान शहरात दिसून आला आणि त्यानंतर तो जगभरात पसरला.

हा नैसर्गिक विषाणू नाही, तो प्रयोगशाळेत बनविला गेला आहे. बरेच देश कोरोनावर लस तयार करण्याचे काम करत आहेत, परंतु त्यात यश मिळालेलं नाही, असेही गडकरी म्हणाले आहेत. अनेक देश या प्राणघातक विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहान लॅबमधून झाल्याचा आरोप करत आहेत. त्याचदरम्यान नितीन गडकरींनी केलेले हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus:...म्हणून त्यावेळी मला खूप दु:ख झालं; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत

पुढच्या वर्षात 5 कोटी रोजगार; नितीन गडकरींनी सांगितलं MSME पॅकेज कसं चमत्कार करणार!

मुंबईला कोरोनामुक्त कधी करणार?, तुम्ही काहीतरी करून दाखवा; आशिष शेलारांचा सेनेवर बाण

CoronaVirus : ...तर कोरोना व्हायरस कधीच संपणार नाही, WHOने दिला गंभीर इशारा

वाद पेटला! चीनची दक्षिण चिनी समुद्रातील 'त्या' भागावर ताबा घेण्याची धमकी; तैवान करणार युद्धाभ्यास

दहशतवाद्यांना झटका! पाक सर्वोच्च न्यायालयानं २९० आतंकवाद्यांचा जामीन रोखला

CoronaVirus News : केंद्रीय अर्थमंत्री आज मोठ्या घोषणा करण्याची शक्यता, शेतकऱ्यांना जबरदस्त फायदा मिळणार?

52 दिवसांपासून ड्युटीवरच नर्स; अचानक मुलीचा व्हिडीओ कॉल आला अन् अश्रूंचा बांध फुटला

CoronaVirus News : पायी बिहारला जाणाऱ्या मजुरांना भरधाव रोडवेज बसने चिरडले, 6 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही; तो प्रयोगशाळेत तयार झालाय, नितीन गडकरींचं रोखठोक विधान

Web Title: lockdown cannot be increased, as indicated by Nitin Gadkari vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.