दहशतवाद्यांना झटका! पाक सर्वोच्च न्यायालयानं २९० आतंकवाद्यांचा जामीन रोखला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 10:30 AM2020-05-14T10:30:17+5:302020-05-14T10:37:12+5:30

या सर्वांना पेशावर हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने यावर कडाडून आक्षेप घेतला आहे.

pak supreme court bars high court from releasing 290 military court convicts bail vrd | दहशतवाद्यांना झटका! पाक सर्वोच्च न्यायालयानं २९० आतंकवाद्यांचा जामीन रोखला

दहशतवाद्यांना झटका! पाक सर्वोच्च न्यायालयानं २९० आतंकवाद्यांचा जामीन रोखला

Next
ठळक मुद्देपाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी इम्रान खान (इम्रान खान) सरकार आणि दहशतवादी संघटनांना मोठा धक्का दिला.लष्करी कोर्टामधून दोषी ठरविण्यात आलेल्या सुमारे 300 दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सहाय्यकांना जामिनावर सोडण्यास पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला.या सर्वांना पेशावर हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने यावर कडाडून आक्षेप घेतला आहे.

इस्लामाबाद:  पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी इम्रान खान (इम्रान खान) सरकार आणि दहशतवादी संघटनांना मोठा धक्का दिला. लष्करी कोर्टामधून दोषी ठरविण्यात आलेल्या सुमारे 300 दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सहाय्यकांना जामिनावर सोडण्यास पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या सर्वांना पेशावर हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने यावर कडाडून आक्षेप घेतला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयानं घेतलेला निर्णय फिरवून त्यांनी सरकारलाही प्रश्न विचारले आहेत.

पेशावर हायकोर्टाच्या खंडपीठानं 2014 सालच्या पेशावर शालेय दहशतवादी हल्ल्यातील दोषी ठरलेल्या २९० दहशतवादी आणि त्यांच्या सहाय्यकांना जामीन देण्याचा विचार केला होता. पाकिस्तान सरकारनं हायकोर्टाला याप्रकरणी एक मोठे खंडपीठ स्थापन करण्याची विनंती केली होती, परंतु या खटल्याची सुनावणी करणारे सरन्यायाधीश वकार अहमद सेठ यांनी ही विनंती फेटाळली.

उच्च न्यायालय मवाळ; परंतु सर्वोच्च न्यायालयात कठोर
पाकिस्तान सरकारने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले, जेथे न्यायमूर्ती मुशीर आलम आणि न्यायमूर्ती काझी अमीन यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. दोषींची जामिनावर सुटका होण्यापासून रोखण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती केली. लष्करी न्यायालयांमधून दोषी ठरविण्यात आलेल्या 70 हून अधिक जणांची शिक्षा रद्द करण्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या आणखी एका अपिलावरही सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेत आहे. अॅटर्नी जनरल खालिद जावेद यांनी युक्तिवाद केला की, उच्च न्यायालयाच्या 290 दोषींना जामिनावर सोडण्याच्या कोणत्याही निर्णयामुळे राष्ट्रीय सुरक्षेचे मोठे नुकसान होईल. त्यानंतर या खटल्याची सुनावणी करणारे सरन्यायाधीश वकार अहमद सेठ यांनी दोषींची याचिका फेटाळत त्यांना जामीन नाकारला. 

इम्रान सरकारनं काळ्या यादीतून हटवले दहशतवाद्यांचे नाव
इमरान सरकारने दहशतवाद्यांच्या ब्लॅकलिस्टमधून 4000 दहशतवाद्यांची नावे काढून टाकली आहेत. या 4000 दहशतवाद्यांमध्ये २००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर ऑपरेशन कमांडर झाकी-उर-रहमान लखवी याचादेखील समावेश आहे, असा दावा आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित एका स्टार्टअपने केला आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : केंद्रीय अर्थमंत्री आज मोठ्या घोषणा करण्याची शक्यता, शेतकऱ्यांना जबरदस्त फायदा मिळणार?

52 दिवसांपासून ड्युटीवरच नर्स; अचानक मुलीचा व्हिडीओ कॉल आला अन् अश्रूंचा बांध फुटला

CoronaVirus News : पायी बिहारला जाणाऱ्या मजुरांना भरधाव रोडवेज बसने चिरडले, 6 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही; तो प्रयोगशाळेत तयार झालाय, नितीन गडकरींचं रोखठोक विधान

विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

Web Title: pak supreme court bars high court from releasing 290 military court convicts bail vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.