लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या व्यथा, वेदना कमी करा; राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 03:01 AM2020-03-28T03:01:51+5:302020-03-28T05:38:01+5:30

कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांची चर्चा यावेळी करण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, हरयाणा, गुजरात, राजस्थान, तेलंगणा आणि पंजाबचे राज्यपाल व दिल्लीचे नायब राज्यपाल व चंदीगडमधील प्रशासनातील वरिष्ठांनी भाग घेतला.

Lockdown, alleviate the pain of the poor; President Ram Nath Kovind and Vice President M Appeal by Venkaiah Naidu | लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या व्यथा, वेदना कमी करा; राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आवाहन

लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या व्यथा, वेदना कमी करा; राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आवाहन

googlenewsNext

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सोबतच एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. या व्हिडिओ कॉन्फरन्सला विविध राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि प्रशासनातील वरिष्ठांची उपस्थिती होती. सरकारने लागू केलेल्या पॅकेजची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशातील नायब राज्यपाल आणि प्रशासनातील वरिष्ठांनी सक्रिय सहकार्य करावे. लॉकडाऊनच्या काळात गरिबांच्या व्यथा, वेदना कमी करा, असे आवाहन यावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांनी सर्व राज्यांना केले.
कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांची चर्चा यावेळी करण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, हरयाणा, गुजरात, राजस्थान, तेलंगणा आणि पंजाबचे राज्यपाल व दिल्लीचे नायब राज्यपाल व चंदीगडमधील प्रशासनातील वरिष्ठांनी भाग घेतला. या संकटाच्या काळात असंघटित क्षेत्रातील कामगार आणि निराधारांपर्यंत सरकारी उपाययोजना पोहचविण्याचे आवाहन यावेळी सर्व राज्यांना करण्यात आले. या व्हिडिओ कॉन्फरन्सला १४ राज्यांचे राज्यपाल उपस्थित होते.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यानंतर केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. केरळातील १८०० निवृत्त डॉक्टर, एमबीबीएसचे विद्यार्थी यांची मदत घेतली जात आहे. लोकांमध्ये जागृती करण्यासाठी ३७५ मानसशास्त्रज्ञांचीही मदत घेतली जात आहे.
तेलंगणाचे राज्यपाल डॉ. तमिलसाई सुंदरराजन यांनी सांगितले की, राजभवन परिसरात राहणाºया ८०० गरजू कुटुंबांना भोजन उपलब्ध करुन दिले जात आहे. एम. व्यंकय्या नायडू यांनी तेलंगणाच्या राज्यपालांना सूचना केली की, चित्रपट कलाकार, लेखक आणि बुद्धीजीवी लोकांची मदत घेतली जावी. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी कोरोनाशी लढण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राज्य सरकारच्या उपाययोजनांची माहिती दिली.

ज्येष्ठ, दिव्यांगांना आगाऊ पेन्शन
- विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना तीन महिन्याची पेन्शन आगाऊ देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रमांतर्गत (एनएसएपी) ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांना ही पेन्शन दिली जाते. हा कार्यक्रम केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतो.
- ही रक्कम लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा होते. २.९८ लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. एनएसएपी अंतर्गत २०० प्रति महिना पेन्शन ६० ते ७९ वर्षांदरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना दिली जाते. तर, ८० वर्षांवरील ज्येष्ठांना ५०० रुपये प्रति महिना दिले जातात.

Web Title: Lockdown, alleviate the pain of the poor; President Ram Nath Kovind and Vice President M Appeal by Venkaiah Naidu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.