शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

एक हात मदतीचा! ओडिशात रक्तदानासाठी तरूणाई सरसावली; ३००० हून अधिक युनिट रक्त जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 13:53 IST

Odisha Train Accident : ओडिशातील रेल्वे अपघाताने संपूर्ण देशाच्या डोळ्यात पाणी आणलं.

odisha train accident death | बालासोर : ओडिशातील रेल्वेअपघाताने संपूर्ण देशाच्या डोळ्यात पाणी आणलं. या अपघातात २८० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे, तर ९०० हून अधिक जखमी आहेत. जखमी रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या जखमींचा जीव वाचवण्यासाठी स्थानिक तरूणांनी जे कार्य केलं त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. जखमी प्रवाशांना रक्ताची गरज असल्याने मोठ्या प्रमाणात तरूणाईने रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला. 

स्थानिक डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ हजारहून अधिक युनिट रक्त जमा झाले आहे. रेल्वे अपघातानंतर सरकारने आवाहन न करता स्वंयस्फूर्तीने लोकांनी रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटल गाठले आहे. बालासोर येथे झालेल्या ट्रेन अपघातात ९०० हून अधिक जखमी आहेत. त्यांच्या उपचारासाठी रक्ताची गरज भासणार आहे. त्यासाठी ओडिशातील जनता बाहेर आली आहे. प्रत्येकाचा जीव वाचवायचा हा निर्धार त्यांनी केला आहे.

"रक्तदानासाठी तरुणाईचा मोठा प्रतिसाद आहे. शेकडो लोकांनी रक्तदान केले. कटक, बालासोर आणि भद्रकमध्ये काल रात्रीपासून ३००० हून अधिक युनिट रक्त जमा झाले. आम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मदत फंडाला देखील हे रक्त पुरवणार आहोत ", अशी माहिती जखमींवर उपचार करत असलेले एससीबी मेडिकल कॉलेज, कटकचे डॉ. जयंत पांडा यांनी दिली. 

तरूणाईचा मदतीचा हात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, ओडिशातील अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले आहेत. अशा अपघातांमध्ये जास्त रक्तस्त्राव होऊन जखमींचा मृत्यू होतो. रुग्णालयांना रक्ताची तातडीची गरज आहे. आतापर्यंत २८० हून अधिक लोक मरण पावले आहेत परंतु हा आकडा आणखी पुढे जाऊ नये म्हणूनच लोकांनी आपल्या मित्रांसह रक्त देण्याचे ठरवले. 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातOdishaओदिशाrailwayरेल्वेAccidentअपघातBlood Bankरक्तपेढी