बापरे! 'या' ठिकाणी 50% लोक कोरोना किंवा व्हायरलच्या लक्षणांनी त्रस्त; सर्व्हेत मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 11:05 IST2023-09-12T10:55:39+5:302023-09-12T11:05:31+5:30
दिल्ली-एनसीआरमधील प्रत्येक दुसऱ्या कुटुंबात कोरोना, व्हायरल किंवा फ्लूने ग्रस्त लोक आहेत. गेल्या महिन्यापासून या चिंतेमध्ये वाढ होत असल्याने व्हायरल आजार आणखी पसरला आहे की नाही हे शोधण्यासाठी Local Circles आणखी एक सर्वेक्षण केलं.

बापरे! 'या' ठिकाणी 50% लोक कोरोना किंवा व्हायरलच्या लक्षणांनी त्रस्त; सर्व्हेत मोठा दावा
दिल्ली-एनसीआर भागात राहणारे लोक गेल्या 3 आठवड्यांपासून व्हायरलबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. त्यानंतर Local Circles ने ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात या आजारांच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी एक सर्वेक्षण केलं, ज्यामध्ये असं दिसून आलं की दिल्ली-एनसीआरमधील सुमारे 21 टक्के घरांमध्ये व्हायरसने ग्रस्त लोक आहेत. त्याच्या कुटुंबातील एक किंवा अधिक सदस्यांना व्हायरलची लक्षणं आहेत. त्याच वेळी, सप्टेंबरपर्यंत हा आकडा 50 टक्क्यांवर पोहोचला.
Local Circles च्या सर्वेक्षणानुसार, दिल्ली-एनसीआरमधील प्रत्येक दुसऱ्या कुटुंबात कोरोना, व्हायरल किंवा फ्लूने ग्रस्त लोक आहेत. गेल्या महिन्यापासून या चिंतेमध्ये वाढ होत असल्याने व्हायरल आजार आणखी पसरला आहे की नाही हे शोधण्यासाठी Local Circles आणखी एक सर्वेक्षण केलं. सर्वेक्षणादरम्यान, Local Circles नी दिल्ली, गुरुग्राम, फरीदाबाद, नोएडा आणि गाझियाबादमधील 9 हजारांहून अधिक लोकांशी संवाद साधला. यापैकी 61 टक्के पुरुष आणि 39 टक्के महिला होत्या.
कोरोना, फ्लू किंवा व्हायरल तापाने ग्रस्त
सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आलं की तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत आणि त्यापैकी किती जण सध्या ताप, नाक वाहणं, घसादुखी, डोकेदुखी, सांधेदुखी, शरीरदुखी आणि श्वसनाच्या समस्यांसारख्या एक किंवा अधिक लक्षणांनी त्रस्त आहेत किंवा व्हायरल तापाची लक्षणे ग्रस्त आहेत? दिल्ली-एनसीआरमधील 9,389 लोकांनी या प्रश्नाचे उत्तर दिलं. त्यापैकी 50 टक्के लोकांनी नोंदवलं की त्यांच्या कुटुंबातील एक ते तीन सदस्य कोरोना, फ्लू किंवा व्हायरल तापाच्या लक्षणांमुळे आजारी आहेत.
33% कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती त्रासलेल्या
सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 50 टक्के लोकांनी सांगितलं की त्यांच्या घरातील कोणालाही फ्लू, व्हायरल किंवा कोविड लक्षणं नाहीत. त्याच वेळी, 33 टक्के लोकांनी सांगितलं की त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य आजारी आहे, तर 17 टक्के लोकांनी सांगितले की त्यांच्या घरातील 2 ते 3 सदस्य कोरोना, फ्लू किंवा व्हायरल तापाने ग्रस्त आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.