शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

निकालाआधीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग; गेहलोत फेव्हरिट, पायलटही दावेदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:05 IST

एक्झिट पोलच्या अंदाजांमुळे विजयाचे वेध; भाजपाला मात्र राज्य राखण्यावर विश्वास

जयपूर : नुकत्याच जाहीर झालेल्या मतदानोत्तर चाचण्यांत राजस्थानामध्ये काँग्रेसला बहुमत मिळण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यामुळे सत्ता आपलीच, या भ्रमात असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. यात आघाडीवर आहेत ते प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट आणि काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तथा राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत.शुक्रवारी एक्झिट पोल जाहीर होताच गेहलोत आणि पायलट हे दोघेही नेते वेगवेगळ्या वेळेत दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा केली. मात्र, निकाल जाहीर झाल्यावर आमदारांच्या पसंतीनुसारच मुख्यमंत्री ठरवणार असल्याचे राहुल गांधी यांनी त्या दोघांनाही सांगितल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.पायलट व गेहलोत राजस्थानात परतल्यावर त्यांनी आपल्या समर्थक उमेदवारांची बैठक घेतली आणि मुख्यमंत्रीपदासाठी आपल्याच नावाची शिफारस करण्याची विनंती केली. काही निष्ठावंतांना फितवण्यासाठी सत्ता स्थापनेनंतर मंत्रिमंडळातील महत्त्वाचे खाते देण्याचे आमिषही दाखवल्याची चर्चा राजस्थानात आहे.पायलट यांची वर्णी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी लागल्यापासून त्यांनी वसुंधरा राजे यांना घेरण्याचा नेहमीच प्रयत्न केला. शिवाय त्यांच्या नेतृत्त्वात पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला होता. हाच काँग्रेससाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह तयार झाला होता. तेव्हापासून त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाऊ लागले. शिवाय राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडचे विश्वासू सरदार असल्यामुळे राजस्थान काँग्रेसमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. याचा फायदा घेत त्यांनी तिकीट वाटपात आपल्या समर्थकांची वर्णी लावली. त्यामुळे त्यांना अशोक गेहलोत, सीपी जोशी यांसारख्या काही ज्येष्ठ नेत्यांचा रोषही पत्करावा लागला होता.दुसरीकडे सुमारे तीन दशके राजस्थान काँग्रेसवर एकहाती पकड असलेल्या अशोक गेहलोत यांची खुर्ची पायलट यांच्यामुळे डळमळीत आहे. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच सचिन पायलट यांच्या नेतृत्त्वाला विरोध केला. कित्येक वेळेस जाहीर कार्यक्रमातूनही गेहलोत यांनी आपली ही खंत कार्यकर्त्यांजवळ बोलून दाखविली आहे. मात्र, हायकमांडकडून अशी वक्तव्ये टाळण्याचे आदेश मिळाल्यानंतर त्यांनी नरमाई घेतली होती. परंतु पायलट यांच्याविषयीचा त्यांचा रोष काही कमी झाला नव्हता. तिकिट वाटपाच्या वेळेस त्यांचा हा रोष बाहेर आलेला दिसला.पायलट यांना मिळणारा प्रतिसाद पाहता आपला पत्ता कापला जाण्याचा अंदाज आल्याने गेहलोत यांनी एका प्रचार सभेत सूचक वक्तव्य करताना म्हटले होते, ‘काँग्रेसच्या संभाव्य मुख्यमंत्र्याबाबत माध्यमांत सध्या दोन नावांचीच चर्चा आहे. पण माझ्या मते सी.पी. जोशी, गिरीजा व्यास, रघू शर्मा, रामेश्वर डुडी आणि लालचंद कटारिया हे देखिल मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम उमेदवार आहेत’. त्यामुळे पायलट यांच्या वाटेत अन्य पाच ज्येष्ठ नेत्यांचा अडसर निर्माण झाला होता. मात्र, पायलट यांनी वेळीच या पाचही नेत्यांशी चर्चा करून आपल्या वाटेतील ‘काटे’ दूर केले होते.कोणाकडे जाणार ‘राणी’चे राज्य?विविध सर्वेक्षणांतून राजस्थानी मतदारांनी अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदासाठी पहिला पसंतीक्रम दर्शविल्याने गेहलोत पुन्हा एकदा शर्यतीत आले आहेत.त्यानंतर वसुंधरा राजे आणि तिसऱ्या स्थानी सचिन पायलट यांना पसंतीक्रम देण्यात आला आहेत. त्यामुळे अशोक गेहलोत यांनी ज्येष्ठ आणि अनुभवी नेता म्हणून आपल्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. मात्र, ११ डिसेंबरला प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतरच मुख्यमंत्री कोण होणार? हे समजेल.राजस्थानच्या भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर वसुंधरा राजे यांनी भाजपाच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. पुन्हा आम्हीच सरकार स्थापन करू असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा