शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

LMOTY 2020 : आम्ही शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांती आणली, अरविंद केजरीवाल यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 9:18 PM

LMOTY 2020 : अरविंद केजरीवाल यांनी गेली ६ वर्षे दिल्लीचे सरकार चालवताना केलेल्या सुधारणांचा आवर्जुन उल्लेख केला. तसेच दिल्लीमध्ये आम्ही शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांती आणली, असे विधान केले.

नवी दिल्ली - लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२० (LMOTY 2020 ) सोहळा आज दिल्लीमध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याहस्ते झाले. यावेळी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गेली ६ वर्षे दिल्लीचे सरकार चालवताना केलेल्या सुधारणांचा आवर्जुन उल्लेख केला. तसेच दिल्लीमध्ये आम्ही शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांती आणली, असे विधान केले. (We have revolutionized education and health in Delhi, says Arvind Kejriwal)

दिल्ली सरकारने केलेल्या विशेष कामांचा उल्लेख करताना अरविंद केजरीवाल  म्हणाले की, दिल्ली सरकारमधील आमच्या अर्थसंकल्पामधील २५ टक्के रक्कम ही शिक्षण क्षेत्रावर खर्च होते. तर १५ टक्के रक्कम ही आरोग्य क्षेत्रावर खर्च होते. असे अन्य कुठेही होत नाही. दिल्लीत आमच्या सरकारी शाळा ह्या खासगी शाळांना तोडीस तोड आहेत. आज आमच्या सरकारी शाळांमध्ये स्वीमिंग पूल आहेत. लिफ्ट आहेत. आमचे शिक्षक बाहेरील देशांमध्ये प्रशिक्षण घेऊन येत आहे. अशा प्रकारे दिल्लीमध्ये शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांती आणली आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.  

दरम्यान, या देशाची ताकद  मोठे लोक नसून छोटी माणसं आहेत, असे विधानही त्यांनी केले. तसेच महाराष्ट्रातील लोकमतच्या कामाचा विशेष उल्लेख केला. लोकमतच महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रच लोकमत आहे. लोकमत खूप चांगलं काम करत आहे. लोकमतकडून पुरस्कार मिळाल्यावर लोक आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतात. मी लोकमत आणि दर्डा कुटुंबाचे अभिनंदन करतो, असेही पुढे सांगितले.

टॅग्स :LokmatलोकमतArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली