शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

हवाई दलाच्या तळाजवळ जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 11:20 IST

राजस्थानमधील नाल-बिकानेर येथील हवाई दलाच्या तळाजवळ एक जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे राजस्थानमधील नाल-बिकानेर येथील हवाई दलाच्या तळाजवळ एक जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुढील तपास करण्यासाठी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहे.गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांकडून भारतीय सैन्याच्या तळांना टार्गेट करण्यात आले आहे.

जयपूर - राजस्थानमधील नाल-बिकानेर येथील हवाई दलाच्या तळाजवळ एक जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा बॉम्ब निकामी करण्यासाठी आणि पुढील तपास करण्यासाठी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहे.

गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांकडून भारतीय सैन्याच्या तळांना टार्गेट करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी (3 एप्रिल) हवाई दलाच्या तळाजवळ आढळून आलेल्या जिवंत बॉम्बमुळे खळबळ उडाली आहे. महिनाभरापूर्वी दहशतवाद्यांकडून पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यांमध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. सीआरपीएफ जवानांचा हा ताफा जम्मूवरुन श्रीनगरला जात होता. त्यावेळी दहशतवाद्यांकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. यानंतर भारतीय हवाई दलाकडून एअर स्ट्राईक करत बालकोट परिसरातील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आलं होतं. 

पूंछ सेक्टरमध्ये LoC जवळ दिसली दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने, अलर्ट जारीभारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वी पूंछ सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ 10 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची दोन विमाने घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले होते. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूंछ सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ 10 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची दोन विमाने घिरट्या घालत असल्याचे भारतीय हवाई दलाच्या रडारने टिपले होते. यानंतर सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. 

पाकच्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर, 3 पाकिस्तानी जवान ठार 

 पाकिस्तानकडून सीमाभागात वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनालाभारतीय जवानांनी चोख उत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या 3 जवानांना भारतीय जवानांनी ठार केलं असून अन्य 1 जवान गोळीबारात जखमी झाला आहे. एलओसीवरील रावलकोट सेक्टरमध्ये भारतीय लष्करी जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबारात जशास तसे उत्तर दिले आहे. पाकच्या मिडीयाकडून अधिकृतरित्या ही आकडेवारी समोर आली असली तरी भारत-पाक गोळीबारात पाकिस्तानच्या 3 पेक्षा अधिक सैन्य मारले गेल्याची माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. 

भारतीय सैन्याकडून लष्कर-ए-तोएबाच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामा येथील लस्सीपुरा भागात पहाटेपासून सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं असून दहशतवाद्यांकडून अनेक हत्यारे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. 

लष्कर ए तोएबाच्या 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. मृत दहशतवाद्यांकडून 2 एके रायफल्स, 1 एसएलआर आणि 1 पिस्तूल जप्त करण्यात आली असून परिसरामध्ये लष्कराकडून शोधमोहीम सुरुच आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 3 जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून पुलवामाच्या त्राल परिसरात गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये एका सामान्य नागरिकाला दहशतवाद्याने गोळी मारल्याने तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मंजूर अहमद हजाम असं या जखमी नागरिकाचे नावं आहे. 

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानBombsस्फोटके