शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकताय? सावधान!'या' चुकीमुळे थेट जेलची हवा खावी लागू शकते; विमान वाहतूक मंत्रालयाचे नवे नियम जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:13 IST

विमान प्रवासादरम्यान इअरफोनशिवाय मोठ्या आवाजात संगीत ऐकणे किंवा व्हिडिओ पाहणे आता प्रवाशांना महागात पडू शकते. सहप्रवाशांच्या गैरसोयीचा विचार करून केंद्र सरकारने विद्यमान नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जगभरात दररोज लाखो नागरिक रेल्वे किंवा विमानाने प्रवास करतात. प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी अनेकजण संगीताचा आधार घेतात. मात्र, स्वतःच्या मनोरंजनासाठी मोठ्या आवाजात गाणी वाजवल्यामुळे अनेकदा सहप्रवाशांची मोठी गैरसोय होते. प्रवाशांच्या याच तक्रारींची दखल घेत सरकारने आता नियमावली कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे विमानामध्ये इअरफोनशिवाय मोठ्या आवाजात संगीत वाजवणे तुम्हाला महागात पडू शकते.

राफेलनंतर आता S-400! रशियासोबत १०,००० कोटींची डील फायनल; पाकिस्तानला '४०० किमी' दूरच रोखण्याची भारताची तयारी

सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत वाजवणे हे जनतेसाठी त्रासदायक आणि सार्वजनिक सुरक्षा नियमांचे उल्लंघन असल्याचे सरकारने मानले आहे. यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होत असल्याने, आता विमान वाहतुकीच्या विद्यमान नियमांनुसार यावर कारवाई करता येईल. विशेष म्हणजे, यासाठी कोणतेही नवीन नियम लागू न करता जुन्याच नियमांची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.

आता कारवाई होणार

विमानात किंवा विमानतळ परिसरात मोठ्या आवाजात संगीत ऐकून इतरांना त्रास देणाऱ्या प्रवाशांवर आता कडक कारवाई केली जाईल. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) जारी केलेल्या 'नागरी विमान वाहतूक आवश्यकता' नुसार ही कारवाई केली जाईल. अशा बेशिस्त प्रवाशांना रोखण्यासाठी आणि त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी DGCA ने आधीच सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत.

केंद्रीय मंत्र्यांनी संसदेत स्पष्ट केले की, 'विमान नियम १९३७ आजही लागू असून त्यांतर्गत कठोर कारवाईच्या तरतुदी आहेत.

नियम २२ (Rule 22): या नियमानुसार, जर एखादा प्रवासी सुरक्षा किंवा शिस्तीचे उल्लंघन करत असेल, तर विमान कंपनी त्या प्रवाशाला विमानात प्रवेश नाकारू शकते किंवा त्याला विमानातून उतरवू शकते.

नियम २३ (Rule 23): हा नियम 'पायलट-इन-कमांड' यांना विशेष अधिकार देतो. विमानाची सुरक्षा किंवा शिस्त धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही प्रवाशाविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार वैमानिकाकडे असतात.

नियम २९ (Rule 29): या नियमांतर्गत, वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांसाठी विशिष्ट शिक्षेची आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Loud music on flights? Jail possible! New aviation rules.

Web Summary : Loud music on flights could lead to jail time. The aviation ministry has tightened rules, empowering airlines to penalize disruptive passengers under existing regulations for disturbing public order and safety.
टॅग्स :airplaneविमान