मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:57 IST2025-12-16T15:41:46+5:302025-12-16T15:57:22+5:30
बंगालमधील स्टेडियममध्ये मेस्सीच्या कार्यक्रमावेळी झालेल्या गोंधळामुळे आता मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
सॉल्ट लेक स्टेडियमवर आयोजित फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी याच्या कार्यक्रमात शनिवारी प्रचंड गोंधळ झाला होता. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले होते. दरम्यान, आता एक मोठी अपडेट आली आहे. बंगालमध्ये राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. राज्याचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बंगालचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याचा दावा केला आहे. युवा भारती घोटाळ्याभोवती सुरू असलेल्या वादात अरुप बिस्वास यांना क्रीडा विभाग सोडण्यास सांगण्यात आले.
डीसी निलंबित
मेस्सी प्रकरणात मुख्य सचिवांनी राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) राजीव कुमार आणि बिधाननगरचे पोलिस आयुक्त (सीपी) मुकेश कुमार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बिधाननगरचे पोलिस उपायुक्त (डीसी) यांना निलंबित करण्यात आले आहे.
२४ तासांत उत्तर मागितले
त्या दिवशी स्टेडियममध्ये गैरव्यवस्थापन आणि त्रुटी का घडल्या आणि कार्यक्रमाचे सुरळीत आयोजन करण्यासाठी खाजगी आयोजकांसह भागधारकांशी योग्य समन्वय का राखला नाही, याचे २४ तासांत स्पष्टीकरण देण्यास डीजीपी राजीव कुमार आणि विधाननगरचे सीपी मुकेश कुमार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या दिवशी कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल डीसीपी अनिश सरकार यांच्याविरुद्ध विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
याशिवाय, युवा व्यवहार आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार सिन्हा यांनाही कार्यक्रमाच्या दिवशी झालेल्या गैरव्यवस्थापन आणि त्रुटींचे स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.