Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 13:37 IST2025-12-13T13:36:15+5:302025-12-13T13:37:20+5:30
Lionel Messi : कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये 'मेस्सी मॅजिक' पाहण्यासाठी आलेले चाहते खूप नाराज झाले आहेत.

Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये 'मेस्सी मॅजिक' पाहण्यासाठी आलेले चाहते खूप नाराज झाले आहेत. मेस्सीला जवळून पाहण्याचं स्वप्न घेऊन स्टेडियमवर पोहोचलेल्या चाहत्यांना फार कमी वेळेसाठी मेस्सी दिसला. त्यामुळे चाहते संतापले. मेस्सी केवळ ५ मिनिटांसाठी स्टेडियममध्ये आला आणि लगेच परत गेला, ज्यामुळे सॉल्ट लेक स्टेडियममध्ये जमलेले चाहते खूप संतापले, हिंसक झाले. संतप्त चाहत्यांनी स्टेडियममध्ये बॉटल्स, बेल्ट आणि खुर्च्या फेकल्या, तसेच होर्डिंग्जची तोडफोड करून आपला राग व्यक्त केला.
मेस्सी सकाळी ११:१५ वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला होता, पण तो लवकर स्टेडियममधून निघून गेला. एका चाहत्याने एनडीटीव्हीशी बोलताना हा कार्यक्रम "पूर्णपणे लाजिरवाणा"असल्याचं म्हटलं कारण मेस्सीने स्टेडियममध्ये पूर्ण फेरी मारली नाही. दुसऱ्या एका चाहत्याने सांगितलं, फारच वाईट इव्हेंट होता, तो फक्त अवघ्या काही मिनिटांसाठी आला. सर्व नेते आणि मंत्री त्याला घेरून उभे राहिले. आम्हाला काहीही पाहता आलं नाही.
Pathetic. Woeful. Poignant.
— Jaikumar Murugesan (@ChoChoJaikul) December 13, 2025
Poor Organised event in Kolkata. Management played with fans emotion.#Messi#MessiInIndia#Messi𓃵#MessiKolkatapic.twitter.com/efrSb7Nwxu
मेस्सी ५ ते १० मिनिटांसाठी आला आणि निघून गेला. एवढा पैसा आणि वेळ वाया गेला. आम्ही काहीही पाहू शकलो नाही असं चाहते म्हणत आहेत. इतकंच नाही तर चाहत्यांनी स्टेडियममध्ये मोठा गोंधळ घातला आहे. चाहते आत घुसून स्टेडियमचं नुकसान करत आहेत. याचे व्हि़डीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.
मेस्सीने अनेक व्यक्तींची भेट घेतली. फिफा विश्वचषक जिंकणारा मेस्सी कोलकातामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि तीन दिवसांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी संध्याकाळी हैदराबादसाठी रवाना होईल. चाहत्यांचा हा संताप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.