उमाळे हाणामारी बातमीला जोड
By Admin | Updated: March 15, 2016 00:32 IST2016-03-15T00:32:59+5:302016-03-15T00:32:59+5:30
सहा ते सातजण जखमी

उमाळे हाणामारी बातमीला जोड
स ा ते सातजण जखमीहाणामारीत दोन्ही गटातील सहा ते सात जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पहिल्या गटातील नीलेश पाटील, मंगेश पाटील, सचिन सोन्ने, नीलेश साबळे यांचा तर दुसर्या गटातील शरद देवीदास खडसे यांच्यासह इतर दोन ते तीन जणांचा समावेश आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. हाणामारीत काहींच्या हाता-पायाला डोक्याला दुखापत झाली आहे.कारचे नुकसान; दुचाकी गायबहाणामारी सुरू झाल्यावर काहींनी दगडफेक केली. त्यात नीलेश पाटील यांच्या (एमएच १९ एएक्स ६८००) या कारचे नुकसान झाले. कारच्या हेड लाईटचा काच फुटला आहे. घटनेवेळी मंगेश पाटील हे त्यांची (एमएच १९, ५६५२) क्रमांकाची दुचाकी घटनास्थळी सोडून तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. त्यानंतर परत गेल्यावर त्यांची दुचाकी तेथे नव्हती, असे त्यांनी सांगितले.दोन्ही गटातील दहा जणांविरुद्ध गुन्हाया हाणामारी प्रकरणी दोन्ही गटातील दहा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यात पहिल्या गटाकडून नीलेश सुभाष पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून आरोपी देवीदास गोविंदा खडसे, भरत देवीदास खडसे, पिंटू खडसे, समाधान खडसे व पंरवाला (पूर्ण नाव-गाव माहिती नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तर दुसर्या गटाकडून शरद देवीदास खडसे यांनी फिर्याद दाखल केली असून आरोपी नीलेश सुभाष पाटील, नीलेश साबळे, सचिन सोन्ने, मंगेश पाटील व भूषण दांडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आरोपींवर भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्ाची नोंद आहे. तपास हेड कॉन्स्टेबल नन्नवरे करीत आहेत.कोट..........मी विकत घेतलेल्या जमिनीची शासकीय मोजणी झाली असून त्या मोजणीच्या चतु:सीमेप्रमाणे कंपाऊंड करायचे होते. त्याठिकाणी वाद झाला. मात्र, त्याविषयी कोणतीही माहिती मला नाही. मी अद्याप शेतीचा ताबा घेतला नाही.-महेंद्र रायसोनी, शेतजमीन विकत घेणारे.उमाळे शिवारातील शेत गट क्रमांक ११९ मध्ये पूर्वीपासून वहिवाटीचा रस्ता आहे. संबंधितांनी जेसीबीच्या साहाय्याने रस्ता बुजून टाकला. रस्ता देण्याची आजूबाजूच्या शेतजमिनीच्या मालकांची आहे. त्यावरूनच वाद झाला. मात्र, घटनेवेळी आम्ही त्याठिकाणी नव्हतो. तरीही गुन्ात आम्हाला गोवण्यात आले आहे.-देवीदास खडसे, उमाळा येथील ग्रामस्थ.