पवननगरातील घटना बातमीला जोड

By Admin | Updated: March 29, 2016 00:25 IST2016-03-29T00:25:43+5:302016-03-29T00:25:43+5:30

जितेंद्रवर मूळगावी अंत्यसंस्कार

Link to news in Pawanagar area | पवननगरातील घटना बातमीला जोड

पवननगरातील घटना बातमीला जोड

तेंद्रवर मूळगावी अंत्यसंस्कार
जितेंद्र मराठे हे मूळचे थाळनेर येथील रहिवासी होते. ते उदरनिर्वाहासाठी गेल्या चार ते पाच वर्षांपासून जळगावात चौघुले प्लॉट भागात राहत होते. औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा रहाटगाडा हाकत होते. त्यांना दोन मुली व मुलगा आहे. दोन ते तीन आठवड्यांपूर्वीच त्यांना मुलगा झाला होता. घरातील कर्ता पुरुष गेल्याने मराठे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या मृतदेहावर सोमवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर थाळनेर येथे दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.
तिघांपैकी दोघे जखमी रुग्णालयात
घटनेत विजेचा धक्का लागल्याने जखमी झालेल्या ज्योती चौधरी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना सोमवारी घरी परत आणण्यात आले. तर रेखा जगताप यांच्यावर जिल्हा रुग्णालयात व भरत पवार यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Link to news in Pawanagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.