...तरच नोव्हेंबरपर्यंत मिळेल मोफत धान्य; मोदी सरकारनं घातली महत्त्वाची अट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 09:47 AM2020-07-05T09:47:38+5:302020-07-05T10:19:04+5:30

पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजनेला मुदतवाढ

link aadhaar card to ration card before 31 july to get free ration till november | ...तरच नोव्हेंबरपर्यंत मिळेल मोफत धान्य; मोदी सरकारनं घातली महत्त्वाची अट

...तरच नोव्हेंबरपर्यंत मिळेल मोफत धान्य; मोदी सरकारनं घातली महत्त्वाची अट

Next

नवी दिल्ली: कोरोना संकटाची तीव्रता पाहता गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोव्हेंबरपर्यंत मोफत अन्न धान्य मिळणार असल्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनची घोषणा करताना तीन महिने मोफत धान्य मिळणार असल्याचं मोदींनी जाहीर केलं होतं. हीच योजना नोव्हेंबरपर्यंत सुरूच राहणार असल्याची घोषणा मोदींनी गेल्या आठवड्यात केली. मात्र आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करणाऱ्या व्यक्तींनाच या योजनेचा लाभ होईल.

पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत सरकार गरिबांना नोव्हेंबरपर्यंत धान्याचा मोफत पुरवठा करणार आहे. मात्र त्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. आतापर्यंत आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक न केलेल्यांसाठी सरकारनं ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत सरकारकडून गरिब कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो गहू/तांदूळ आणि एक किलो चणे दिले जात आहेत. हे धान्य महिनाभरासाठी पुरवण्यात येत आहे. तीन महिन्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आता नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील.

पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करणं बंधनकारक आहे. त्यासाठी सरकारनं आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी दिलेली मुदतही वाढवली आहे. जास्तीत जास्त लोकांना पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेचा लाभ घेता या दृष्टीनं आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी ३१ जुलैपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. 

रेशन कार्ड आधारला लिंक कसं कराल?
१. रेशन कार्डला आधारसोबत लिंक करण्यासाठी UIDAI चं अधिकृत संकेतस्थळ uidai.gov.in वर जा.
२. स्टार्ट नाऊचा पर्याय निवडा.
३. तुमचा पूर्ण पत्ता भरा. (जिल्हा आणि राज्याच्या माहितीसह)
४. उपलब्ध पर्यायांमधून रेशन कार्डचा पर्याय निवडा.
५. यानंतर तुमचा रेशन कार्ड क्रमांक, आधार क्रमांक, ई-मेल आणि मोबाईल नंबर भरा.
६. यानंतर तुमच्या मोबाईलवर वन टाईम पासवर्ड (ओटीपी) येईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्क्रीनवर नोटिफिकेशन येईल.
७. तुमच्या अर्जाची पडताळणी झाल्यावर रेशन कार्डला आधार लिंक होईल.
 

Web Title: link aadhaar card to ration card before 31 july to get free ration till november

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.